JOIN US
मराठी बातम्या / मनी / Health Insurance : हेल्थ इन्शुरन्सविषयी कन्फ्यूस्ड आहात? सोप्या शब्दात समजून घ्या ही माहिती

Health Insurance : हेल्थ इन्शुरन्सविषयी कन्फ्यूस्ड आहात? सोप्या शब्दात समजून घ्या ही माहिती

आपण सर्वजण हेल्थ इन्शुरन्स घेण्याचा विचार करतो. परंतु त्याच्याशी संबंधित गोष्टी माहित नसल्यामुळे आपण तो घेणं टाळत असतो. यासोबतच या स्पर्धेच्या युगात योग्य आरोग्य विमा निवडणेही आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू नये.

जाहिरात

हेल्थ इन्शुरन्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Health Insurance : सध्याच्या काळात आपण सर्व मेडिकल खर्चाचा विचार करून आरोग्य विमा काढण्याचा विचार करतो. दुसरीकडे, यावेळी विमा बाजारात विविध प्रकारचे आरोग्य विमा उपलब्ध आहेत, ते पाहिल्यानंतर तुमचा गोंधळ उडतो. दुसरीकडे, तुम्ही घाईघाईने कोणतीही आरोग्य विमा योजना निवडली असेल, तर भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशा वेळी आम्ही तुमचं हे कन्फ्यूजन दूर करणार आहोत. सध्या आरोग्य विम्याच्या क्षेत्रात सरकारी आणि खाजगी कंपन्यांचा चांगला सहभाग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊनच आरोग्य विमा निवडावा.

हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आणि डिस्काउंटशी संबंधित या गोष्टी घ्या जाणून

सरकारी हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांची प्रीमियम योजना खाजगी कंपन्यांपेक्षा कमी असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त प्रीमियम हवा असेल तर तुम्ही खाजगी आरोग्य विमा कंपन्यांची निवड करावी. यासोबतच खाजगी कंपन्या आरोग्य विमा योजनांवर कमी डिस्काउंट देतात, तर दुसरीकडे सरकारी कंपन्या चांगल्या डिस्काउंट देतात.

Home Loan: होम लोनचा ईएमआय भरणं कठीण जातंय? तुमच्याकडे आहेत ‘हे’ पर्याय

NCB फायदे आणि कव्हरेज बद्दल जाणून घ्या

तुम्हाला NCB म्हणजेच नो क्लेम बोनसचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारी कंपन्यांच्या आरोग्य विमा योजना घेऊ नका कारण त्यांच्या योजनांसोबत NCB बेनेफिट्स मिळत नाहीत. यासोबतच तुम्ही खासगी कंपन्यांचा आरोग्य विमा घेतलात तर तुम्हाला NCB चा लाभ मिळेल. यासह, सरकारी आरोग्य विमा कंपन्यांच्या योजनांमध्ये तुम्हाला खूप लिमिट्स मिळतात, तसेच प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांच्या प्लानमध्ये सर्व मेडिकल खर्च कव्हर केले जातात. अशा वेळी तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्लान निवडू शकता.

Indian Railway: रेल्वेचा खास नियम! ‘या’ वेळेत TTE चेक करु शकत नाही तुमचं तिकीट

संबंधित बातम्या

आरोग्य विम्यामधून टॅक्स सूट मिळू शकते

तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला बरीच टॅक्स सूट मिळेल. आयकराच्या कलम 80D अंतर्गत, तुम्हाला त्याचा प्रीमियम भरल्यास 25,000 रुपये आणि तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्यासाठी प्रीमियम भरल्यास यामध्येही तुम्हाला 50 हजार रुपयांची चांगली सूट मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या