JOIN US
मराठी बातम्या / मनी / या बँकेने महिलांसाठी आणल्या आहेत खास स्कीम, सुरू करा तुमचा व्यवसाय आणि मिळवा चांगली कमाई

या बँकेने महिलांसाठी आणल्या आहेत खास स्कीम, सुरू करा तुमचा व्यवसाय आणि मिळवा चांगली कमाई

देशातील दुसरी मोठी सरकारी बँक PNB (Punjab National Bank) ने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 डिसेंबर: देशातील दुसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB Punjab National Bank) ने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. पीएनबीने या  योजना खास महिलांसाठी बनवल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत (financial Help) केली जाते. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा एक बिझनेस सेटअप करू शकता. जाणून घ्या काय आहेत या योजना- 1.पीएनबी महिला उद्यमी निधी स्कीम महिलांना व्यावसायिक बनवण्यासाठी या योजनेअंतर्गत पीएनबीकडून कर्ज दिले जाते. महिलांना नवीन व्यापार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामध्ये  नवीन तंत्रज्ञान, व्यापार वृद्धी आणि नवीन टॅलेंटला मदत करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. 2. पीएनबी महिला समृद्धी योजना या योजनेअंतर्गत चार स्कीम आहेत. या योजनेअंतर्गत कोणताही व्यापार किंवा व्यवसायाच्या यूनिटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा सेटअर करण्यात मदत मिळते. याकरता तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकता आणि व्यवसाय अधिक सुखकरपणे करू शकता. (हे वाचा- जानेवारीत 16 दिवस राहणार बँका बंद,खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी) 3. पीएनबी महिला सशक्तीकरण अभियान PNB Mahila Sashaktikaran स्कीम अंतर्गत तुम्हाला व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. बचतगट किंवा अन्य नॉन प्रॉफिट संस्थांमार्फत बिगर कृषी उपक्रमांशी संबंधित व्यवसाय स्थापित करण्यात बँक महिलांना आर्थिक मदत करते. (हे वाचा- Opinion: बडे उद्योग म्हणजे काही गरिबांना गिळणारे राक्षस नव्हेत) 4. क्रेच सुरू करण्यासाठी स्कीम जर एखादी महिला तिच्या घरामध्ये किंवा घराबाहेर क्रेच सुरू करण्याचा व्यवसाय करण्याचा विचार करत असेल तर पीएनबी बँकेकडून तिला मदत मिळू शकते. या लोनअंतर्गत त्या महिलेला बेसिक सामान, भांडी, स्टेशनरी, फ्रिज, कूलर तसंच पंखे, आरओ आणि ग्रोथ मॉनिटर करण्यासाठी मदत करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या