केएफसी
KFC हे नाव किंवा या फूड स्टोअरचा बोर्ड तुम्हाला अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये दिसला असेल. पण केएफसीचा फूल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? केएफसीचा फूल फॉर्म ‘केंटकी फ्राइड चिकन’ असा आहे. ही अमेरिकन फास्ट-फूड रेस्टॉरंट चेन आहे. यांचं फ्राइड चिकन जगप्रसिद्ध आहे. ही कंपनी जवळपास पाच दशकांपासून अमेरिकन संस्कृतीचा एक भाग आहे. कंपनी इतकी यशस्वी झाली आहे की त्यांनी गेल्यावर्षी फ्राइड चिकनचे 20 बिलियन पेक्षा जास्त पिसेस ग्राहकांना सर्व्ह केल्याचा अंदाज आहे. आज केएफसीची यशोगाथा, तो इतका लोकप्रिय ब्रँड बनण्यामागची कारण काय, याबद्दल जाणून घेऊयात. ‘थिंक विथ निश’ वेबसाईटने या संदर्भात माहिती दिली आहे. केएफसीची सक्सेस स्टोरी KFC ची स्थापना कर्नल हार्लंड सँडर्स यांनी केली होती. त्यांनी 1930 च्या सुमारास वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आपलं नशीब आजमावलं. त्यापैकी एक म्हणजे केएफसी होय. जगभरातील सुमारे 5 बिलियन लोकांनी कधीतरी KFC रेस्टॉरंटला भेट दिली आहे. भविष्यात कोणत्याही दिवशी पृथ्वीवरील लोकसंख्येपैकी 8% लोक KFC ला भेट देतील असा अंदाज आहे. मात्र, हे एका रात्रीत घडलं नाही. फक्त 100 डॉलर्ससह एका छोट्या रेस्टॉरंटच्या रूपात या कंपनीची सुरुवात झाली होती. काळजीपूर्वक नियोजन आणि नशिबाने KFC एक आंतरराष्ट्रीय पॉवरहाउस बनलं आहे. Success Story: ना IIT ना IIM ची डिग्री, तरीही कोट्यवधींची सॅलरी; रोज 36 लाख कमावते ही व्यक्ती! 1936 मध्ये कर्नल सँडर्स यांनी आपल्या रेस्टॉरंटसाठी फ्राईड चिकनची एक नवीन रेसिपी तयार केली त्यांनी त्याला “युरेका मोमेंट” असं म्हटलं होतं. त्यामुळे चिकन अधिक क्रिस्पी होतं. हा शोध त्यांच्या बिझनेससाठी खूप चांगला होता, कारण लोकांना नवीन रेसिपी आवडली आणि जवळपास अशी कोणतीही रेस्टॉरंट्स नव्हती जिथे अशी रेसिपी मिळायची. पण दुसर्या महायुद्धात छापेमारी झाल्याने कर्नल सँडर्स यांचे घर उद्ध्वस्त झाले आणि त्यांनी सर्वस्व गमावले. अखेरीस पुन्हा फूड बिझनेसमध्ये परत येण्यापूर्वी ते केंटकीमध्ये राज्य पोलीस अधिकारी म्हणून काम करू लागले. पुढच्या वेळी कर्नल सँडर्स यांनी फ्राइड चिकन वापरून रेसिपी आणखी मोठी करण्याचा प्रयत्न केला. 1952 मध्ये त्यांनी रेस्टॉरंट्ससाठी त्यांची रेसिपी फ्रँचायझिंग सुरू केलं होतं. कंपनी यशस्वी कशामुळे होते? इतक्या वर्षांनंतर KFC अजूनही जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहे. त्यात कर्नल सँडर्स यांचं मोठं योगदान आहे. कर्नल सँडर्स इतके यशस्वी कशामुळे झाले? 1) त्यांनी रेसिपीची चाचणी घेण्यासाठी एक सिस्टिम सेट केली आणि नंतर त्या परफेक्ट होईपर्यंत त्यात सुधारणा केली. 2) त्यांनी दर्जेदार इन्ग्रिडियंट्सवर लक्ष केंद्रित केलं. 3) ट्रेंडमध्ये राहण्यासाठी ते नेहमी नवीन आयडिया व इनोव्हेशन्सचं स्वागत करायचे. 4) त्यांनी लिटल लीग टीम्सना स्पॉन्सर करून आणि नैसर्गिक आपत्तींनंतर अन्नदान करून समाजाचं ऋण फेडलं. 5) ते स्वत: ला खूप छान प्रेझेंट करायचे. सूट आणि टाय घालणं, केस व्यवस्थित विंचरणं, नखं नेहमी स्वच्छ ठेवणं या गोष्टी ते फॉलो करायचे. 6) “We cook chicken right!” हे त्यांचं मिशन क्लिअर होतं. Success Story : डॉक्टर अन् कलेक्टरची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आता आहे हजारो कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक KFC इतकं यशस्वी का आहे? KFC ची स्थापना 1930 मध्ये हार्लंड सँडर्स यांनी केली होती, ते कर्नल सँडर्स म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरी बनवल्या जाणाऱ्या चिकनच्या रेसिपीची चव लोकांपर्यंत पोहोचावी या साठी त्यांनी 1952 मध्ये बिझनेसचं फ्रँचायझिंग सुरू केलं. रेस्टॉरंटमधील फ्राईड चिकन रेसिपीमुळे त्यांना पट्कन यश मिळालं. एकेकाळी KFC ची एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये 600 पेक्षा जास्त फ्रँचायझी स्टोअर्स होती. मिरपूड आणि मीठ यांसारख्या मसाल्यांचा वापर यामुळे KFC चे फ्राइड चिकन इतर फास्ट-फूड ब्रँडपेक्षा वेगळे आहे. कर्नल सँडर्स म्हणायचे की रेसिपीमध्ये फक्त 11 हर्ब्ज आणि मसाले असावेत. परंतु बऱ्याच लोकांच्या मते यात 12 मसाले आहेत. मसाल्यांच्या संख्येबद्दल अस्पष्टता असली तरी त्यामुळे त्यांचे फ्राइड चिकन प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांनी चांगलं नाव निवडलं आणि एक ऑथेंटिक ब्रँड तयार केला. जेणेकरून ग्राहक जेव्हा त्यांच्या एखाद्या रेस्टॉरंटला भेट देतात तेव्हा चांगल्या गुणवत्तेच्या अन्नाची अपेक्षा करू शकतात. KFC हे 1930 पासून फास्ट फूड आणि रेस्टॉरंट उद्योगांमध्ये आघाडीवर असलेले एक प्रमुख नाव आहे. कंपनीने त्यांची मूळ रेसिपी कायम ठेवली आणि त्यामुळे ते यशस्वीरित्या जगातील सर्वात मान्यताप्राप्त ब्रँडपैकी एक बनले आहे. त्यांनी रेसिपी बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी मूळ रेसिपी केवळ ग्राहकांनाच आवडत नाही तर ती केएफसीला लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावरही ठेवते. त्यांचं चिकन लोकांना इतकं आवडतं की गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त चिकन पिसेस ग्राहकांना सर्व्ह केले. ही संख्या प्रचंड मोठी आहे. प्रत्येक ब्रँडच्या यशाची कहाणी सारखी नसते. किंबहुना प्रत्येक कंपनी आणि व्यक्तीचीही नसते. पण, तुमचं वय किंवा अनुभव कितीही असला तरी केएफसीची यशोगाथा नक्कीच प्रेरणा देणारी आहे. तुमच्याकडे चांगली कल्पना असेल आणि तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, हेच केएफसीच्या यशोगाथेतून शिकण्यासारखं आहे.