आयटीआर
मुंबई, 10 जून: आर्थिक वर्ष 2022-23 आणि असेसमेंट ईयर 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याचा सीझन आला आहे. अशा वेळी, जर तुम्ही नोकरदार व्यक्ती असाल आणि तुमचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल, तर तुमच्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही दंडाशिवाय ITR भरायचा असेल तर तुमच्याकडे 31 जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. त्याच वेळी, 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही दंड भरून दाखल करू शकता. बरेचदा असं दिसतं की, ज्यांचा पगार टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहे ते आयटीआर फाइल करत नाहीत. परंतु तुम्ही तसे करणं टाळायला हवं. तुमचा पगार टॅक्स स्लॅबपेक्षा कमी असला तरी आयटीआर दाखल केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. कोणते फायदे मिळतील हे जाणून घेऊया.
तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबपेक्षा कमी असला तरीही तुम्ही आयटीआर फाइल करायला हवा. तुम्ही हे डॉक्यूमेंट्स उत्पन्नाचा पुरावा म्हणून अनेक प्रकारे वापरू शकता. बँकेपासून क्रेडिट कार्डपर्यंत कर्ज घेताना, तुम्हाला सर्वत्र उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. अशा वेळी, आयटीआर दाखल केल्यानंतर, तुम्ही हा डॉक्यूमेंट उत्पन्नाचा पुरावा म्हणून वापरू शकता.
अनेकदा कंपन्या लोकांच्या उत्पन्नातून TDS कापतात. त्यांचा पगार टॅक्स स्लॅबच्या बाहेर असुनही असं केलं जातं. अशा परिस्थितीत, तुम्ही आयकर रिटर्न भरून तुमच्या कापलेल्या टीडीएसवर सहज क्लेम करू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये कट केलेला डीडीएस ट्रान्सफर करतो.
Health Insurance : हेल्थ इन्शुरन्सविषयी कन्फ्यूस्ड आहात? सोप्या शब्दात समजून घ्या ही माहितीतुम्ही आयटीआर फाइल केल्यास, तुम्ही सहज व्हिसासाठी अप्लाय करू शकता. व्हिसा अॅप्लिकेशनसाठी आयटीआर संबंधित कागदपत्रे मागवली जातात. अनेक देशांचा व्हिसा मिळण्यापूर्वी लोकांचे उत्पन्न पाहिले जाते. अशा परिस्थितीत त्यांना त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कळते.
तुम्ही विहित मर्यादेत आयटीआरचा क्लेम केला तर तुम्ही कॅपिटल गेन किंवा बिझनेसमध्ये झालेल्या नुकसानासाठी क्लेम करु शकता. आयकराच्या नियमांनुसार, कॅरी फॉरवर्ड लॉसचा फायदा फक्त त्या लोकांनाच मिळतो जे त्याच आर्थिक वर्षात निश्चित वेळेत आयटीआर फाइल करतात.