JOIN US
मराठी बातम्या / मनी / ITR भरण्याची डेडलाइन वाढणार का? पाहा सरकारने काय म्हटलं

ITR भरण्याची डेडलाइन वाढणार का? पाहा सरकारने काय म्हटलं

Income Tax Return Filing: असेसमेंट ईयर 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाइन 31 डेडलाइन 31 जुलै 2023 आहे. म्हणजेच, तुमच्याजवळ रिटर्न फाइल करण्यासाठी आता फक्त 2 आठवड्यांचा वेळ शिल्लक आहे.

जाहिरात

आयटीआर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जुलै: असेसमेंट ईयर 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यावेळी रिटर्न भरण्याचं काम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 2.50 कोटी आयटीआर फाइल करण्यात आले आहेत. आताही मोठ्या संख्येत आयकरदातांनी रिटर्न दाखल केलेला नाही. अनेक लोकांना वाटतं की, सरकार आयटीआर भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलेल. मात्र सरकारचा डेडलाइन वाढवण्याचा सध्या विचार दिसत नाही. सरकारने गेल्या वेळीही रिटर्न फाइल करण्याची डेडलाइन वाढवली नव्हती. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी पीटीआय-भाषेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अर्थ मंत्रालय इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत वाढवण्याच्या विचारात नाही. तसेच त्यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर रिटर्न भरण्यास सांगितले. मल्होत्रा ​​म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक रिटर्न भरले जाण्याची आमची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत सुमारे 5.83 कोटी आयकर रिटर्न भरले होते.

2.5 कोटींहून अधिक ITR फाइल आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध डॅशबोर्डनुसार, आतापर्यंत 11,30,85,146 इंडिव्हिज्युअल यूझर्सनी पोर्टलवर स्वतःची नोंदणी केली आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 2,61,07,869 आयकर रिटर्न भरले गेले आहेत. यापैकी सुमारे 2,40,69,116 रिटर्नचे व्हेरिफिकेशन करण्यात आले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आतापर्यंत दाखल केलेल्या एकूण रिटर्नपैकी 1,12,91,905 रिटर्नवर प्रोसेस केली आहे. Income Tax रिफंडचे 5 नियम, तुम्हाला माहिती असायलाच हवेत, येणार नाही कोणताच प्रॉब्लम! यावेळी रिटर्न वेगाने भरले जात आहेत यावेळी रिटर्न भरण्यासाठी टॅक्सपेयर्समध्ये मोठा उत्साह आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक कोटी आणि दोन कोटी रिटर्न कमी वेळेत भरले गेले. यावेळी 11 जुलैपर्यंत देशात 2 कोटी लोकांनी आयटीआर भरले होते. गेल्या वर्षी 20 जुलैपर्यंत 2 कोटी रिटर्न भरले होते. अशाप्रकारे यावेळी हा आकडा 9 दिवस आधीच पूर्ण झाला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, 26 जूनपर्यंत एक कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. तर गेल्या वेळी 8 जुलै रोजी आयटीआर फाइल करणाऱ्यांची संख्या एक कोटीवर पोहोचली होती. ITR: घरभाडं मिळत असेल तर द्यावा लागेल टॅक्स, पण या ट्रिकने बचावासाठी करता येतं जुगाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या