कॅनडाचे IRCC मंत्री अहमद हुसेन यांनी सांगितलं, आम्हाला जगभरातले कौशल्य असलेले लोक हवे आहेत.
मुंबई, 22 जून : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा असते. अर्थात, त्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. कारण त्या संस्थेत इतर कामांसाठीही माणसं लागतात. नुकतीच ISRO नं 41 जागांवर भरती करण्यासाठी व्हेकन्सी काढलीय. यामध्ये फिटर, प्लंबर, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, टर्नर, वेल्डर अशा अनेक जागांसाठी भरती सुरू आहे. या पदांसाठी 10वी, 12वी झालेले अर्ज करू शकतात. तसंच ITI आणि NTC चं सर्टिफिकेटही हवं. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 जुलै. पदं फिटर, प्लंबर, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, टर्नर, वेल्डर नोकरदारांसाठी महत्त्वाचं; ‘हे’ आहेत फाॅर्म 16शी जोडलेले अधिकार पदांची संख्या 41 शैक्षणिक पात्रता या पदांसाठी 10वी, 12वी झालेले अर्ज करू शकतात. तसंच ITI, NTC आणि NTC चं सर्टिफिकेटही हवं. मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत तुम्ही घरबसल्या मिळवू शकाल पेन्शन वयाची मर्यादा उमेदवाराचं वय 2. 7. 2019 रोजी 35 वर्षापर्यंत हवं. 35 वर्षांहून जास्त वयाचा उमेदवार नको. मोदी सरकारची खास योजना, देतात मोफत ट्रेनिंग आणि 8 हजार रुपये पगार वेगवेगळ्या पदांसाठी वेगळे पगार आहेत. पगार 18,000 पासून 69,100 पर्यंत आहे. असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी lpsc.gov.in इथे अर्ज करावा. ज्यांना सरकारी नोकरी करायचीय त्यांना ही चांगली संधी आहे. ISRO सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या संस्थेत काम करण्याची ही मोठी संधी आहे. या संस्थांमध्ये काम करण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवार लागतात. मात्र दहावी, बारावी, आयटीआय झालेल्यांना ही चांगली संधी आहे.चांद्रयान2 या प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ISRO कडे जगभरातल्या वैज्ञानिकांचं लक्ष लागलेलं आहे. भारताच्या प्रगतीमध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं VIDEO