नवी दिल्ली, 14 जुलै : IRCTC ने पर्यटकांसाठी अंदमान टूर पॅकेज आणले आहे. ‘देखो अपना देश’ अंतर्गत हे टूर पॅकेज सुरू करण्यात आले आहे. या टूर पॅकेजचा प्रवास हैदराबादपासून सुरू होणार आहे. प्रवाशांना अंदमानमधील अनेक ठिकाणी स्वस्त टूरवर नेण्यात येणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 6 दिवसांसाठी अंदमान टूर पॅकेज IRCTC चं अंदमान टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचं आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक एअर मोडने प्रवास करतील. तुमच्या खिशात 45,540 रुपये असल्यास तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक आयलंड, नील आयलंड आणि रॉस आणि नॉर्थ बे आयलंडचा फेरफटका मारता येणार आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवाशांना अंदमानातील सर्वात उंच ठिकाणे सुविधेसह पाहता येणार आहेत. या टूर पॅकेजला अमेझिंग अंदमान असं नाव देण्यात आलंय. IRCTC: व्हिएतनाम आणि कंबोडियाची सैर करायचीये? ‘हे’ आहे 9 दिवसांच खास टूर पॅकेज हे IRCTC टूर पॅकेज कधी सुरू होईल? IRCTC चं हे टूर पॅकेज 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजचं पूर्ण नाव Amazing Andaman X Hyderabad असे आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही सिंगल प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 58,440 रुपये मोजावे लागतील. तर, जर तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 45830 रुपये भाडे द्यावे लागतील. तसंच जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 45,540 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये तुमच्यासोबत मुले असल्यास, बेडसह 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 41255 रुपये आणि 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 37860 रुपये भाडे ठेवण्यात आले आहे. IRCTC चं खास टूर पॅकेज! फिरुन या हरिद्वार, वैष्णो देवी आणि गोल्डन टेम्पल IRCTC च्या या टूर पॅकेजचे बुकिंग टुरिस्ट रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येते. महत्त्वाचं म्हणजे IRCTC च्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत असेल.