फिक्स्ड डिपॉझिट की टाइम डिपॉझिट काय आहे बेस्ट?
Investment Tips : पोस्ट ऑफिसच्या सेविंग स्किम्स आणि बँक फिक्स्ड डिपॉझिट हे आपल्या देशात सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात. या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे बुडण्याचा धोका नसतो आणि यावर व्याजही चांगले मिळते. सरकारने आता पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट अकाउंटच्या व्याजदरात वाढ केली आहे. टाइम डिपॉझिटचे व्याजदर आता6.8 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांपर्यंत झाले आहेत. हा एक अतिशय आकर्षक व्याजदर आहे.
टाइम डिपॉझिट ही एक प्रकारची एफडीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 1, 2, 3 किंवा 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. टाइम डिपॉझिट अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर केले जाऊ शकते. टाइम डिपॉझिट जॉइंट अकाउंट देखील उघडता येते. मॅच्युरिटीवर टाइम डिपॉझिट अकाउंटचा कालावधी वाढवला देखील जाऊ शकतो.
सध्या सरकार 1 वर्षाच्या टाइम डिपॉझिटवर 6.8 टक्के व्याज देत आहे. 2-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर 6.9%, 3-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर 7% आणि 5-वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर 7.5% व्याज देत आहे.
ATM मधून एका दिवसात किती काढता येतात पैसे? तुम्हाला माहितीय का हा नियम?जर तुम्हाला भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एका वर्षासाठी एफडी केली तर तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के आणि तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज मिळेल त्याचप्रमाणे, देशातील आघाडीची खाजगी बँक एचडीएफसी एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.6 टक्के वार्षिक व्याज आणि दोन, तीन आणि पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे.
FD Time Period: कमीत कमी किती दिवसांसाठी करता येते FD?तुम्हाला पाच वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करावी. कारण येथे तुम्हाला 7.5 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी एसबीआय आणि एचडीएफसीला पाच वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर कमी व्याज मिळतेय. तसंच तुम्हाला दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही बँक एफडीमध्ये गुंतवणूक करावी. एसबीआय आणि एचडीएफसी बँक दोन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहेत, तर टाइम डिपॉझिटवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे.