रिटायरमेंट प्लानिंग
नवी दिल्ली, 14 जून : कमी वयात रिटायर होणे हे अनेकांचे स्वप्न असते. तसं पाहिलं तर निवृत्तीचं वय हे 65 वर्षे मानलं जातं. पण या वयाच्या आधीपासूनच सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करुन शांततेत आयुष्य घालवणं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र वेळेपूर्वी आपली आर्थिक लक्ष्य पूर्ण करणंही खूप आव्हानात्मक आहे. तसेच, निवृत्तीपूर्वी आणि नंतर आपले उत्पन्न टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. शांततापूर्ण रिटायरमेंटसाठी तुमचे उत्पन्न, कर्ज आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
महागाई लक्षात घेता तुम्ही तुमची 15% बचत वैद्यकीय गरजांसाठी ठेवायला हवी. मुलांच्या शिक्षणासाठी 5% पर्यंत ठेवणे ही योग्य कल्पना मानली जाते. महागाईचा वाढता दर पाहता, लोकांना त्यांच्या निवृत्तीसाठी पैसे वाचवणे खूप कठीण होतंय. बचतीचा मोठा भाग मुलांच्या फी आणि मेडिकल इमर्जेन्सीमध्ये वापरला जाऊ शकतो. यासोबतच छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात सातत्याने कपात केली जातेय. स्पष्टच सांगायचं झालं तर रिटायरमेंटसाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करावी लागेल. जेणेकरुन तुमच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. म्युच्युअल फंड हा योग्य मार्ग रिटायरमेंटचे हे लक्ष्य पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करू शकता. यासोबतच, प्रत्येक गुंतवणूकदाराची वेगवेगळी जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता, येथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. इक्विटीबद्दल बोलायचे झाल्यास, म्युच्युअल फंड तुम्हाला जोखीम घेण्याचे बरेच ऑप्शन देतात. मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंड यासारख्या जोखमीच्या इक्विटी कॅटेगिरी आहेत. ते तुम्हाला दीर्घकाळापर्यंत चांगले रिटर्न देऊ शकतात. यासोबतच, स्टॉक मार्केटमध्ये तुमची सक्रियता वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ज्या म्युच्युअल फंडमध्ये विविधता असते आणि जे बाजारातील चढ-उताराने जास्त प्रभावित होत नाहीत तेच म्युच्युअल फंड रिटायरमेंटच्या हिशोबाने चांगले मानले जातात.
Home Loan : आता 40 वर्षांसाठी मिळेल होम लोन, भाड्यापेक्षा कमी असेल EMI!लवकर गुंतवणूक सुरू करा तुम्हाला सामान्य वयाच्या आधी निवृत्त व्हायचे असेल तर आधीच तयारीला लागावं लागेल. तुम्हाला लवकर गुंतवणूक सुरू करावी लागेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर मानली जाते. तुम्ही लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केल्यास तुम्हाला त्याचे फायदेही जास्त होतात. तुम्ही लवकर गुंतवणूक केल्यास जोखीम घेण्याची क्षमताही अधिक असते. एवढंच नाही तर बाजारात पैसा जितका जास्त काळ टिकतो तितके जास्त रिटर्न तुम्हाला मिळतात. याच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टेही वेळेवर पूर्ण करू शकता. योग्य ऑप्शनमध्ये गुंतवणूक करा तुम्ही लवकर रिटायर होण्याचा पर्याय निवडत असाल तर तुमच्या उत्पन्नातील मोठा भाग तुम्ही खर्च करु शकणार नाहीत. तसेच, निवृत्तीपूर्वी स्वत:साठी निधी तयार करण्यासाठी तुमच्याकडे कमी वेळ असेल. यामुळे तुम्ही गुंतवणुकीसाठी दीर्घकालावधीत रिटर्न देणारे म्युच्युअल फंड निवडा. तसेच, तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकेल.
स्पेशल पुरुषांसाठी आहे LIC ची ही पॉलिसी! मिळतील जबरदस्त फायदेगुंतवणुकीची रक्कम दरवर्षी वाढवा लवकर रिटायरमेंटसाठी दरवर्षी उत्पन्नात वाढ होण्यासोबतच गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा. या वाढत्या महागाईच्या जमान्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम त्याच प्रमाणात वाढणार नाही. त्यामुळे, दर वर्षी तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी गुंतवलेली रक्कम वाढवावी, जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीचे रिटर्न भविष्यातील महागाई लक्षात घेऊन तुमच्या गरजा पूर्ण करेल. दर काही दिवसांनी पोर्टफोलिओ मॅनेज करा तुमच्या गुंतवणुकीत सक्रियता आणि सातत्य असायला हवे. नियमितपणे गुंतवणूक करणे आणि वेळोवेळी तुमची गुंतवणूक सक्रियपणे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न हवे असल्यास दर काही दिवसांनी पोर्टफोलिओ आणि गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील महागाई पाहता तुम्ही केलेली गुंतवणूक योग्य आहे की नाही ते कळेल. योग्य नसेल तर नियोजन बदलता येईल.