JOIN US
मराठी बातम्या / मनी / Mutual Fundsमधून करा मोठी कमाई; अशा प्रकारे करा फंडाची निवड

Mutual Fundsमधून करा मोठी कमाई; अशा प्रकारे करा फंडाची निवड

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानला जातो. याच्याद्वारे गुंतवणुकदारांना चांगला फायदाही होतो.

जाहिरात

म्यूचुअल फंड - SEBI ने मल्टीकॅफ म्यूचुअल फंडसाठी असेट अलोकेशन नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक असणार आहे, जो आता किमान 65 टक्के आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे : तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Funds) गुंतवणूक (Investment) करायची आहे, पण जोखीम (Risk) घेण्याची भीती वाटत असेल तर या काही टिप्सचा जरूर उपयोग करा. या आधारे तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकाल आणि तुमची गुंतवणुकीतील जोखीम कमी होईल. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे इक्विटी म्हणजेच शेअर्समधील गुंतवणुकीपेक्षा अधिक सुरक्षित (Secure) मानलं जातं. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत केवळ जोखीम कमी असते असं नाही तर त्यावर आकर्षक परतावा देखील मिळतो. मात्र यासाठी योग्य फंडाची निवड करणं आवश्यक असतं. गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंडाची निवड करणं हे मोठं आव्हान असतं कारण बाजारात हजारो म्युच्युअल फंड योजना आहेत. त्यातून योग्य पर्याय निवडणे खूप कठीण आहे. या पाच निकषांच्या आधारे तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडू शकता आपले ध्येय निश्चित करा : सर्व प्रथम तुम्ही तुमचं गुंतवणूक उद्दिष्ट निश्चित करणं आवश्यक आहे. तुम्ही जी गुंतवणूक करता त्यावर तुमचे उद्दिष्ट अवलंबून असतं. बँक बचत आणि आपली गरज यानुसार फंड निवडा. जोखीम कमी असलेले पर्याय निवडा : बहुतेक सर्व गुंतवणुकीत जोखीम असतेच. त्यामुळं कमीत कमी जोखीम असणारी आणि आपल्याला अपेक्षित परतावा देणारी गुंतवणूक योग्य मानली जाते. तुम्ही घेतलेल्या जोखमीच्या तुलनेत उत्तम परतावा देणारा म्युच्युअल फंड उत्तम मानता येतो. परताव्याचे मुल्यांकन करणं सोपं नाही. यासाठी अनेक सांख्यिकी तंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळं सर्वसामान्यपणे कमी जोखीम आणि अपेक्षित परतावा देणारा फंड निवडणे लाभदायक ठरते. वाचा:  PPF अकाउंट मॅच्युअर झाल्यावर तुमच्याकडे काय काय पर्याय असतात? कामगिरी पहा : म्युच्युअल फंडाची कामगिरी जाणून घेणंही महत्त्वाचे आहे. एकाच प्रकारच्या फंडाची तुलना करणं योग्य आहे. कोणत्याही फंडाची निवड करण्यापूर्वी या फंडाचा उद्देश तुमच्या गुंतवणूकीच्या उद्दिष्टांशी जुळतो का आणि फंडाशी संबंधित जोखमी काय आहेत, या दोन बाबींची पडताळणी करणं आवश्यक आहे. पोर्टफोलिओ तपासा : ज्यांना गुंतवणुकीबाबत फार माहिती नाही, त्यांना पोर्टफोलिओ (Portfolio) तपासणे थोडे कठीण होऊ शकतं; मात्र पोर्टफोलिओ आणि होल्डिंग्ज यांच्या विश्लेषणावरून फंडाची गुंतवणूक कुठे केली जात आहे त्याची कल्पना येते. म्युच्युअल फंड कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करीत आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. फंडाची आधीची कामगिरी कशी होती : एखाद्या फंडानं पूर्वी चांगली कामगिरी (Performance) केली असेल तर याचा अर्थ असा नाही की भविष्यातही तो चांगली कामगिरी करेल. अर्थात यामुळे अपेक्षा निर्माण होते;पण फंडाची आधीची कामगिरी तपासणे आवश्यक आहे. ज्या फंडाची कामगिरी सातत्यानं चांगली राहिली असेल आणि त्याचे क्रेडेन्शियल्स उत्तम असतील तर त्या फंडाची निवड करणं योग्य ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या