इंश्योरेंस क्लेम रिजेक्ट झाल्यास काय करावे?
मुंबई, 10 फेब्रुवारी: विमा पॉलिसी ही कोणतीही व्यक्ती अचानक उत्पन्न खर्चासाठी किंवा कोणत्याही अनुचित घटनेच्या वेळी कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी खरेदी केली जाते. परंतु अनेक वेळा असे दिसून येते की या ना त्या कारणाने अनेक इंश्योरेंस क्लेम कंपन्यांकडून नाकारले जातात. या सर्व समस्या लक्षात घेता, विमा नियामक IRDAI ने अनेक नियम बनवले आहेत, ज्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेक कारणांमुळे इंश्योरेंस कंपन्या आपला क्लेम रिजेक्ट करु शकतात. ज्यामध्ये इंश्योरेंस काढताना आपल्या आरोग्याविषयी योग्य माहिती न देणे, कागदपत्रांमध्ये विभिन्न माहिती असणे. पॉलिसीच्या शर्थींचे उल्लंघन केलेले असणे. अशा कारणांचा समावेश असतो. यामुळे पॉलिसी काढताना या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवावे.
जर तुमचा इंश्योरेंसकडून तुमचा क्लेम रिजेक्ट केला असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल आणि दाव्याबाबत तक्रार दाखल करावी लागेल. फ्लाइटमध्ये प्रवास करताना करु नका ‘या’ चुका, अन्यथा…
विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमची समस्या सुटली नाही, तर तुम्ही विमा नियामक IRDAI कडे तक्रार करू शकता. यासाठी तुम्ही IRDAI च्या Complaints@irdai.gov.in या ईमेलवर तक्रार दाखल करू शकता. याशिवाय, तुम्ही टोल फ्री क्रमांक 155255 किंवा 1800 4254 732 चीही मदत घेऊ शकता.
प्री-अप्रूव्ड लोन म्हणजे काय? सामान्य लोनपेक्षा यात वेगळे काय? घ्या जाणूनतुम्ही तुमच्या परिसरातील Insurance Ombudsman म्हणजेच विमा लोकपालकडे इंश्योरेंस क्लेम न मिळाल्याबद्दल तक्रार करू शकता. विमा लोकपालविषयीची माहिती तुम्हाला इंश्योरेंस कंपनीकडे मिळेल.