JOIN US
मराठी बातम्या / मनी / फिरण्यासाठी कार नाही चालत-फिरतं लग्जरी घरच घ्या, तेही केवळ 500 रुपयांत; पाहा या कंपन्यांची ऑफर

फिरण्यासाठी कार नाही चालत-फिरतं लग्जरी घरच घ्या, तेही केवळ 500 रुपयांत; पाहा या कंपन्यांची ऑफर

येणाऱ्या दिवसांत वॅकेशनचा प्लॅन असेल आणि कार रेंटवर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. 500 रुपये ताशी या हिशोबाने एक लग्जरी कार ज्याला घरच म्हणता येईल असा पर्याय सोबत घेऊन जाता येऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मार्च : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पुढच्या महिन्यापासून लोकांचे समर वॅकेशन प्लॅन्सही सुरू होतील. येणाऱ्या दिवसांत वॅकेशनचा प्लॅन असेल आणि कार रेंटवर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. 500 रुपये ताशी या हिशोबाने एक लग्जरी कार ज्याला घरच म्हणता येईल असा पर्याय सोबत घेऊन जाता येऊ शकतो. परदेशात याचा आधीपासूनच ट्रेंड आहे. परंतु आता भारतातही याची क्रेझ वाढू लागली आहे. अनेक राज्यांच्या पर्यटन विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. कॅरावॅन (caravans) - या लग्जरी आणि चालतं-फिरतं घरच म्हटलं जाणाऱ्या या वाहनाला कॅरावॅन असं म्हणतात. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अशाप्रकारच्या घरसारख्या वाहनातून पिकनिकसाठी जाताना दाखवण्यात आलं आहे. यात एका चार ते पाच लोकांच्या कुटुंबासाठीची जागा असते. झोपण्यासाठी गादी, जेवणं बनवण्यासाठी गॅस, अंघोळीसाठी बाथरुम, मनोरंजनासाठी टीव्ही अशा घरासारख्याच अनेक सुविधा या कॅरावॅनमध्ये मिळतात. ही गाडी कुठेही थांबवता येते आणि यात राहण्यासाठीही जागा असल्याने हॉटेलमध्ये राहण्याची गरज भासत नाही.

(वाचा -  GoldPrice:सोने-चांदी दरात 13000 रुपयांहून अधिक घसरण;किंमती किती कमी-जास्त होणार? )

इतकं असतं भाडं - अशी वाहनं भारतातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये भाड्याने मिळू शकतात. यासाठी स्वत: ड्राईव्ह करता येत नाही. यात कंपनीचाच ड्रायव्हर असतो. वेगवेगळ्या शहरांत आणि वाहनाच्या हिशोबाने याचं भाडं वेगवेगळं असू शकतं. परंतु या गाडीसाठी तासाला 500 ते 1000 रुपये भाडं आकारलं जातं.

(वाचा -  स्वस्त दरातील औषधांसह, रोजगाराच्या संधीही उपलब्ध; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन )

या कंपन्या देतात ही सर्व्हिस - बँगलोरमध्ये Campervan Camps and Holidays India नावाची कंपनी कॅरावॅन उपलब्ध करते. कर्नाटकात अनेक लोकेशन्समध्ये कॅरावॅन पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ, इंदौरमध्ये Wacation Wheels नावाच्या कंपनीत कॅरावॅन बुक करता येऊ शकते. दिल्लीत motorhome नावाची कंपनी देशातील अनेक ऍडव्हेंचर्स ट्रिपसाठी कॅरावॅन उपलब्ध करुन देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या