JOIN US
मराठी बातम्या / मनी / इंडिगोने देशातील दोन खास शहरांदरम्यान सुरू केली थेट विमानसेवा, प्रवाशांना मिळणार अनेक पर्याय

इंडिगोने देशातील दोन खास शहरांदरम्यान सुरू केली थेट विमानसेवा, प्रवाशांना मिळणार अनेक पर्याय

नव्या फ्लाइटमुळे अधिक प्रवासी तर वाढतीलच, शिवाय प्रवाशांना अनेक पर्यायही मिळू शकतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बजेट विमान कंपनी इंडिगोने अनेक मार्गांवर नवीन थेट उड्डाणे सुरू केली आहेत. इंडिगो मंगळवारी देशातील दोन विशेष शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करणार आहे. इंडिगोने सुरू केलेल्या नवीन फ्लाइटचे दरही अगदी वाजवी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. देशांतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांना जास्तीत जास्त स्थानकांसाठी थेट उड्डाणे घेता यावीत यासाठी, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने इंदूर-चंदीगड (चंदीगड ते इंदूर नॉन स्टॉप फ्लाइट) दरम्यान थेट उड्डाणे सुरू केली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि इंदूरमधील इतर मान्यवरांनी मंगळवारी यासंबंधित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होतील - नव्या फ्लाइटमुळे अधिक प्रवासी तर वाढतीलच, शिवाय प्रवाशांना अनेक पर्यायही मिळू शकतील. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, उड्डाणे अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेत की, बिजनेसच्या संदर्भात प्रवास करणार्‍या प्रवाशांना आणि बाकीच्या प्रवाशांना प्रवास करताना आराम मिळू शकेल. इंडिगोने सुरू केलेल्या नवीन फ्लाइटचे दरही अगदी वाजवी ठेवण्यात आले आहेत. मुंबई ते ग्वाल्हेर दरम्यान थेट विमानसेवा - सुमारे 280 विमानांच्या ताफ्यासह, इंडिगो एअरलाइन 74 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय स्थानांना जोडणारी 1,600 पेक्षा जास्त उड्डाणे दररोज चालवत आहे. विमान कंपनीने अलीकडेच मुंबई ते ग्वाल्हेर दरम्यान थेट उड्डाणे सुरू केली आहेत. ही उड्डाणे आठवड्यातून चार वेळा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी चालतील. हेही वाचा -  एकच नंबर! ‘या’ क्रेडिट कार्डवर मिळतोय 3 लाखांचा फ्री लाइफ इन्शुरन्स, असा करा ऑनलाइन अर्ज

तुम्ही याप्रमाणे तिकीट बुक करू शकता -

एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट https://www.goindigo.in/ ला भेट देऊन प्रवासी इंडिगो फ्लाइटसाठी तिकीट बुक करू शकतात. त्याचप्रमाणे, तुम्ही https://www.spicejet.com/ वर स्पाइसजेटच्या नवीन थेट फ्लाइटसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या