मुंबई, 13 सप्टेंबर : भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचं अनुमान इंटरनॅशनल माॅनेटरी फंड (IMF)- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी काढलं. त्यांनी सांगितलं की, काॅर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामक अनिश्चितता आणि नाॅन बँक आर्थिक कंपन्यांचा कमकुवतपणा यामुळे ही वाढ धीम्या गतीनं होतेय. जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2019 आणि 2020मधल्या भारताच्या आर्थिक वाढीचं भाकित केलंय. ही वाढ दोन्ही वर्षात 0.3 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यात पुढे म्हटलंय, GDP 7 आणि 7.2 टक्केच होणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा कमजोर झालीय. PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात ‘असे’ मिळतील पैसे पण वाॅशिंग्टनमधल्या ग्लोबल आर्थिक संस्थेनं सांगितलंय की, भारतात अर्थव्यवस्थेची वाढ जगापेक्षा जलद होईल. भारत चीनच्या खूप पुढे जाईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राइस म्हणाले, ‘भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर आहे. काॅर्पोरेट आणि पर्यावरणीय नियामक अनिश्चितता आणि नाॅन बँक आर्थिक कंपन्यांचा कमकुवतपणा यामुळे ही वाढ धीम्या गतीनं होतेय.’ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, ‘हे’ आहेत तुमच्या शहरातले दर सरकारच्या डेटाप्रमाणे आर्थिक वाढ गेल्या सात वर्षात खूपच मंद गतीनं झाली. एप्रिल ते जूनमध्ये ती अवघी 5 टक्के झाली. तर वर्षभरापूर्वी ती 8 टक्के होती. राइस म्हणाले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष आहे. आगामी जागतिक अर्थकारणाच्या नजरेतून आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन करू. सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही ‘असं’ खरेदी करा Gold भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ऑगस्टमध्ये दिली होती. गेल्या 70 वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चागंलाच धक्का बसला आहे. ‘खाजगी कंपन्यांना विश्वासात घ्यायला हवं. पूर्ण वित्तीय प्रणालीसाठी सध्याचा काळ जोखमीचा आहे. याआधी 35 टक्के रोकड उपलब्ध होती. पण आता तीही उपलब्ध नाही. या सर्व कारणांमुळे अर्थव्यवस्था अत्यंत ढासळली आहे,’ अशी कबुली नीती आयोगाच्या राजीव कुमार यांनी दिली होती. देशात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला, अशी आकडेवारी आहे. VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण