JOIN US
मराठी बातम्या / मनी / Indian Railway चा मोठा निर्णय; आता ट्रेनही भाड्याने घेता येणार, काय आहे योजना?

Indian Railway चा मोठा निर्णय; आता ट्रेनही भाड्याने घेता येणार, काय आहे योजना?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railways Minister Ashwini Vaishnav) यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील.

जाहिरात

indian railways

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : लोकांच्या सोईसाठी भारतील रेल्वे (Indian Railway) नवनवीन सुविधा, योजना घेऊन येत आहे. देशभरात देवदर्शनासाठी देखील रेल्वेने विषेश ट्रेन (Indian Railway Special trains) सुरु केल्या आहेत. आता भारतीय रेल्वेने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत कोणतीही राज्य सरकार किंवा कंपनी भाड्याने ट्रेन घेऊ शकते. यासाठी स्टेक होल्डर्सशी रेल्वे मंत्रालयाची (Railway Ministry) चर्चा झाली आहे. या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे. या योजनेंतर्गत, 3333 कोच म्हणजेच 190 गाड्या रेल्वेने राखीव ठेवल्या आहेत. भारत गौरव ट्रेन धावणार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vainshav) यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सुमारे 190 गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी या गाड्यांची संख्या वाढवता येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

स्वस्त घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियाकडून लिलाव; नोंदणी कुठे करायची? पर्यटनस्थळी जातील गाड्या या विशेष ट्रेन्स पर्यटनस्थळांसाठी चालवल्या जाणार आहेत. रेल्वेमंत्री म्हणाले की, भारत गौरव ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी गाड्या चालवणार आहे. Paytm ची घसरण थांबली, शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी; काय आहे आज शेअरची किंमत? आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू सूत्रांच्या माहितीनुसार, आजपासून या गाड्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय मार्ग ठरवण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC दोन्हीद्वारे चालवली जाऊ शकते. या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या