JOIN US
मराठी बातम्या / मनी / घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस

घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस

Indian Railway - रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून रेल्वे बरेच बदल करतंय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून रेल्वे बरेच बदल करतंय. रेल्वेनं आता नव्या टेक्नाॅलाॅजीचा वापर करायचं ठरवलंय. त्याबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. रेल्वे तिकीट काढण्यासाठी आता लांब रांगा लावाव्या लागत नाहीत, तसं तिकीट रद्द करणंही सोपं झालंय. तुम्ही फक्त एक काॅल करून तुमचं रेल्वे तिकीट रद्द करू शकता. त्याबद्दलच जाणून घेऊ- पूर्ण तिकीट रद्द करायचं असेल तर? तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 139 वर काॅल करावा लागेल. काॅल केल्यानंतर तुम्हाला 10 आकडी पीएनआर नंबर सांगावा लागेल. तुम्ही तिकीट काढताना फाॅर्मवर जो फोन नंबर भरला होता त्यावरून तुम्हाला फोन करावा लागेल. तुमच्याकडे फोन नंबर कन्फर्म केला जाईल. साउथ इंडिया बँकेत सुरू आहे बंपर भरती, ‘या’ पदांसाठी असा करा अर्ज यानंतर तुमच्या मोबाइल फोनवर एक वन टाइम पासवर्ड (OTP ) येईल. त्याची माहिती तुम्हाला फोनवर द्यावी लागेल. त्यानंतर तिकीट रद्द होईल. नंतर रिफंडसाठी तुम्हाला काउंटरवर जावं लागेल आणि ओटीपी सांगून तुमचे पैसे परत मिळतील. ‘असा’ करा योगाचा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये 139 नंबरवर काय काय सुविधा मिळतात? 139 वर मेसेज करून ट्रेनची येण्या-जाण्याची वेळ, ट्रेनचं नाव आणि नंबर, PNR स्टेटस, राहण्याच्या सुविधेबद्दल, भाडं याबद्दल माहिती कळते. रेल्वेनं या नंबरवर इंटरअॅक्टिव व्हाॅइस रिस्पाॅन्स सुविधाही दिलीय. या फोनवर प्रवासी आता टॅक्सीही बुक करू शकतात. सामान उचलण्यासाठी हमालही बोलवता येतो. आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं काही प्रवाशांची तिकिटं रद्द करायची असतील तर? यासाठी तुम्हाला 139 नंबरवर काॅल करावा लागेल आणि पीएनआर नंबरवर माहिती द्यावी लागेल. तिकीट घेताना तुम्ही जो मोबाइल नंबर दिला असेल, त्याची माहिती कन्फर्म केली जाईल. त्यानंतर तुम्हाला ज्यांची तिकिटं रद्द करायची असतील त्या प्रवाशांचा क्रम सांगावा लागेल. ही माहिती दिल्यानंतर ओटीपी येईल. त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर त्या प्रवाशांची तिकिटं रद्द होतील. पासवर्डची माहिती देऊन तुम्ही तुमचा रिफंड काही दिवसांनी काउंटरवरून घेऊ शकता. VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या