नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: भारत सरकारने गुरुवारी बिझनेस प्रोसेस आउटसोअर्सिंग (BPO), आयटी आधारित सेवा (ITeS) देणाऱ्या कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. टेक उद्योगाला दिलासा देण्याासाठी BPO आणि IT कंपन्यांसाठीचे नियम शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नोंदणी आणि अनुपालनासंबंधिचे नियम शिथिल केल्यामुळे कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम सुविधा देणे अधिक सोपे होणार आहे. नवीन नियमांनुसार, घरातून काम करण्यासाठी किंवा कुठुनही काम करण्यासाठी (Work From Anywhere) एक पोषक वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे वेळोवेळी कामाबाबत करावे लागणारे रिपोर्टिंग आणि अन्य जबाबदाऱ्यांमध्ये देखील शिथिलता आणली आहे. एका अधिकृत निवेदनामध्ये असे म्हटले आहे की यामगचा उद्देश टेक उद्योग मजबूत करणे हाच आहे. टेक इंडस्ट्रीकडून दीर्घकाळापासून वर्क फ्रॉम होमच्या नियमता शिथिलता आणण्याची मागणी होत होती. त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम कायमस्वरुपात जारी राहण्याची शक्यता आहे. (हे वाचा- PM Kisan: 25 दिवसानंतर तुमच्या खात्यात येणार 2000 रुपये, असा तपासा तुमचा रेकॉर्ड ) ओएसपी कंपन्या अर्थात अशा कंपन्या ज्या दूरसंचार संसाधनांच्या माध्यमातून अॅप्लिकेशन आणि आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा किंवा कोणत्याही प्रकारच्या आऊटसोअर्सिंग सेवा प्रदान करतात. या कंपन्यांना आयटी, कॉल सेंटर, बीपीओ आणि नॉलेस प्रोसेस आउटसोअर्सिंग कंपन्या म्हटले जाते. दूरसंचार विभागाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे घरातून काम करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळेल. यात आता कुठूनही काम (Work From Anywhere) असा विस्तार देखील केला जात आहे. यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, विस्तारित एजंट तसंच रिमोट एजंलटा (Work From home/Anywhere) काही अटीशर्तींसह मान्यता देण्यात आली आहे. (हे वाचा- Gold Price: या आठवड्यात पहिल्यांदा स्वस्त झालं सोनं,डॉलरमधील तेजीमुळे उतरले दर ) या नवीन गाइडलाइननुसार, एजंटलाच ओएसपी केंद्राचा रिमोट एजंट म्हटले जाईल आणि त्याला इंटरन कनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंट देशात कुठुनही काम करू शकतो. आयटी क्षेत्रात सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून भारताची ओळख निर्माण करणे हे यामागचे उद्देश्य आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांना देखील नवीन नियमांमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘वर्क फ्रॉम एनिवेअर’ संबंधित नवीन नीती आत्मसात केल्याने मोठी साहाय्यता मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट कोरोनाव्हायरसमुळे बीपीओ आणि आयटी कंपन्यांचे कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. आता नवीन नियमांमुळे ओएसपीसाठी नोंदणी करण्याची आवश्यकता देखील संपवण्यात आली आहे. त्याचबरोबर बीपीओ कंपन्यांनाही या मर्यादेतून वगळण्यात आले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट केले आहे की, ‘देशातील आयटी क्षेत्र हा आपला अभिमान आहे, संपूर्ण जग या क्षेत्राची ताकद ओळखतो, देशातील नवीन आणि विकासासाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सरकार नेहमी वचनबद्ध आहे. या निर्णयामुळे देशातील तरुणांना पुढे जाण्यासाठी आणि प्रगती करण्यास प्रोत्साहित केले जाईल.’