JOIN US
मराठी बातम्या / मनी / COVID-19 : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात

COVID-19 : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका, पगारात होणार 35 टक्के कपात

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या (Indiabulls Housing Finance) वरिष्ठ मॅनेजमेंटने त्यांच्या पगारात 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Corornavirus) जगभरातील अनेक लहानमोठ्या अर्थव्यवस्थांचे नुकसान झाले आहे. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर तर कोरोनाचे भीषण परिणाम झाले आहेत. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देशातील कंपन्या विविध उपाय करत आहेत. मात्र काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या एकंदरित परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे. देशात कोरोनाच्या संकटामुळे इंडिया इंक म्हणजेच भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यास सुरूवात केली आहे.  इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या (Indiabulls Housing Finance) वरिष्ठ मॅनेजमेंटने त्यांच्या पगारात 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच अप्पर लेव्हल मॅनेजमेंटमधील पदांवर असणाऱ्यांंच्या पगारात ही कपात होणार आहे. (हे वाचा- सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव ) कंपनीच्या सीनिअर मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार ही कपात चालू आर्थिक वर्षासाठी (Current Financial Year) आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये हे नमुद करण्यात आलेले नाही की ही कपात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या प्रभावामुळे करण्यात येत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही कपात खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येत आहे. दरम्यान कंपनीचे चेअरमन समीर गहलोत त्यांचा पूर्ण पगार घेणार नाही आहेत. तर कंपनी व्हाइस चेअरमन, MD आणि CEO गगन बंगा यांच्या पगारात 75 टक्के कपात होणार आहे. (हे वाचा- कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन) कोरोना व्हायरस संक्रमणाच्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक यांनी चालू फिस्कल वर्षात केवळ 1 रुपया पगार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 15 टक्के कपात केली आहे. विमानकंपनी इंडिगोने देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. मात्र इंडियाबुल्सने त्यांनी केलेली कपात कोरोनामुळे आहे, याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या