मुंबई, 17 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC (Life Insurance Corporation of India) IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने IPO साठी कागदपत्रे देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केली आहेत. IPO साठी दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP च्या मसुद्यानुसार, सरकार आपला 5 टक्के हिस्सा इक्विटी शेअर्सद्वारे विकणार आहे. 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत BSE वर लिस्ट केलेल्या 5,249 शेअर्सपैकी 255.4 लाख कोटी रुपयांच्या एकूण मार्केट कॅपपैकी 3.7 टक्के (9.4 लाख कोटी) LIC ची मालकी आहे. ब्रोकरेज व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या डेटानुसार, जे विविध कंपन्यांमधील त्यांचे स्टेक आहे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एलआयसीचा 6.13 टक्के हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) देखील LIC मधील मोठ्या भागभांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. ज्यामध्ये LIC ची डिसेंबर 2021 पर्यंत 6.13 टक्के भागीदारी होती. याशिवाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS, इन्फोसिस, एसबीआय, आयटीसी, आयसीआयसीआय बँकेतही एलआयसीची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे. Instant Loan : पर्सनल लोनसाठी आता बँकेत जायची गरज नाही; Google Pay वर झटपट मिळवा लोन या कंपन्यांमध्ये एलआयसीची 10 टक्क्यांहून अधिक भागीदारी ITC, हिंदुस्तान कॉपर, NMDC, MTNL, लार्सन अँड टुब्रो (L&T), हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), ऑइल इंडिया अशा काही कंपन्या आहेत ज्यात विमा कंपनीची 10 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. एसीसी, अंबुजा सिमेंट्स, इंडिया सिमेंट्स, भारत बिजली, सीडीएसएल, डीसीएम श्रीराम, ग्रासिम, महिंद्रा अँड महिंद्रा, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, टाटा स्टील आणि टाटा पॉवर इत्यादी बोर्ड्सवर एलआयसीचे नॉमिनेडेड देखील आहेत. Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले? एलआयसीची 75 हजार कोटींची कर थकबाकी एलआयसीने सादर केलेल्या ड्राफ्ट पेपरमध्ये सरकारने कंपनीवर सुमारे 75 हजार कोटी रुपयांचे कर दायित्व दिल्याचे आढळून आले आहे. ड्राफ्ट पेपरनुसार, LIC मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराची (Direct and Indirect Tax) 63 मोठी प्रकरणे सुरू आहेत. यामध्ये केवळ प्रत्यक्ष कराची 37 प्रकरणे आहेत, ज्यातून 72,762.3 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. अप्रत्यक्ष कराच्या 26 प्रकरणांमधून 2132.3 कोटी वसूल केले जाणार आहेत. अशा प्रकारे कंपनीवर एकूण 74,894.5 कोटी रुपयांची कर थकबाकी बाहेर येत आहे. देशातील कोणत्याही एका कंपनीवर हा सर्वाधिक कर आहे.