मुंबई, 5 मे : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC चा IPO अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा आयपीओ बुधवारी लॉन्च करण्यात आला. IPO उघडण्याच्या पहिल्या दिवशी, पॉलिसीधारक आणि कर्मचार्यांकडून याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा कोटा पूर्णपणे भरला. पण, किरकोळ गुंतवणूकदारांचा पहिल्या दिवशी अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात वाढ (Repo Rate) करण्याच्या निर्णयाचा एलआयसी आयपीओवरही नकारात्मक परिणाम झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. ग्रे मार्केट प्रीमियमवर (GMP) नजर टाकली तर रेपो दरवाढीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअर्सवरील प्रीमियम हळूहळू वाढत होता, परंतु आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर त्यावर दबाव आला आहे. ब्लू आधार कार्डबद्दल माहिती आहे का? कुणासाठी तयार केलं जात आणि कसं बनवून घ्यायचं? प्रीमियममध्ये घसरण मनीकंट्रोलच्या अहवालानुसार एलआयसीच्या शेअर्सना पूर्वी बाजारात 72 रुपये प्रीमियम मिळत होता. त्यानंतर ते 85 रुपये झाले. ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम सतत वाढत गेला आणि तो प्रथम 105 वर गेला आणि नंतर 125 वर पोहोचला. पण इथून तो मागे पडला आहे. आता तो 125 रुपयांवरून 65 रुपयांवर घसरला आहे. या ग्रे मार्केटमध्ये, एलआयसीच्या शेअरचा प्रीमियम त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळपास निम्मा आहे. PPF की SSY मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी कोणती योजना फायदेशीर? नीट समजून घ्या बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की, प्रति शेअर 60 रुपये प्रीमियम देखील कमी नाही. LIC IPO ची किंमत 902-949 रुपये आहे. पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सवलत मिळत आहे, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांनाही प्रति शेअर 45 रुपये सूट दिली जात आहे. अशाप्रकारे, प्रीमियम जोडल्यास, इश्यूच्या किंमतीवरही, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपयांपेक्षा जास्त नफा मिळत आहे. पहिल्या दिवशी 67 टक्के सबस्क्रिप्शन एलआयसीचा आयपीओ बुधवारी लॉन्च झाल्याच्या पहिल्या दिवशी 67 टक्के सबस्क्राइब झाला. पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातील सर्व शेअर्ससाठी बोली लावण्यात आली. मात्र, किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा पूर्णत: सबस्क्राईब होऊ शकला नाही. मात्र, या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान उघडलेल्या 90 लाख डिमॅट खात्यांवरून याचा अंदाज लावता येऊ शकतो. LIC IPO मध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांना अधिक वेळ मिळत आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदारांचा कोटाही पूर्णपणे भरला जाईल अशी अपेक्षा आहे.