मुंबई, 8 फेब्रुवारी : आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिस लि. (Inox Green Energy Services Ltd - IGESL) ने बाजार नियामक सेबीकडे 740 कोटी रुपयांच्या IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. IGESL ने सोमवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे एक ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, IGESL च्या IPO मध्ये 370 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स जारी केले जातील. कंपनीकडून 370 कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सच्या विक्रीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये, IGESL च्या संचालक मंडळाने IPO द्वारे निधी उभारण्यास मान्यता दिली होती. Multibagger Share : ‘या’ टेक्सटाईल शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग अदानी विल्मर शेअर लिस्टिंग अदानी विल्मरचा शेअर (Adani Wilmar Share) NSE वर 227 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला, जो त्याच्या 230 रुपयांच्या वरच्या किंमत बँडपेक्षा 3 रुपये कमी आहे. मात्र अल्पावधीत, अदानी विल्मारचा स्टॉक मजबूत झाला आणि तो इंट्राडेमध्ये NSE वर 267 रुपयांच्या पातळीवर गेला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार 300-320 रुपयांच्या टार्गेट किमतीसाठी स्टॉक होल्ड करु शकतात, तर अल्प-मुदतीसाठी गुंतवणूकदार सुमारे 280 रुपये नफा मिळवू शकतात. Adani Wilmar चे शेअर साधारण लिस्टिंगनंतर मजबूत स्थितीत, गुंतवणूकदारांना आता काय करावं? गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला 27 ते 31 जानेवारी दरम्यान तीन दिवस उघडलेल्या अदानी विल्मरच्या IPO ला 17.37 पट बोली मिळाली. IPO ला सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, जरी त्या काळात बाजारातील अस्थिरतेचा थोडासा परिणाम झाला. IPO साठी सर्वाधिक बोली लावणारे बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NIIs) च्या श्रेणीतून आले होते, ज्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्यापेक्षा 56.30 पट जास्त बोली लावली होती. शेअरहोल्डर्स कोटा दुसऱ्या क्रमांकावर होता, ज्याला 33.33 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले.