सार्वजनिक क्षेत्रातल्या (PSU Sector) बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली, 27 जून : जर तुमचं सिंडिकेट बँकेत (Syndicate Bank) खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा सध्याचा IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच सुरू राहील. त्यानंतर 1 जुलै 2021 पासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. कॅनरा बँक अलर्ट - कॅनरा बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने पुन्हा एकदा सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना जाहिरातीद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कॅनरा बँकेसह सिंडिकेट बँकेच्या विलिनीकरणानंतर SYNB ने सुरू होणारे सर्व eSyndicate IFSC बदलले आहेत. SYNB सुरू होणारे सर्व IFSC कोड 1 जुलै 2021 पासून डिसेबल होणार आहेत. आता ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS चा वापर करताना CNRB ने सुरू होणाऱ्या नव्या IFSC कोडचा वापर करावा लागेल.
सिंडिकेट बँकेचे ग्राहक IFSC आणि MICR कोडबाबत माहितीसाठी कॅनरा बँकेच्या http://www.canarabank.com/ वेबसाईटवर माहिती घेऊ शकतात. इथे ‘What’s New’ वर क्लिक करुन ‘KIND ATTN eSYNDIATE CUSTOMERS: KNOW YOUR NEW IFSC’ वर क्लिक करा. त्याशिवाय ग्राहक 18004250018 या क्रमांकावरही संपर्क करू शकतात.