JOIN US
मराठी बातम्या / मनी / Cinema पाहायला जाताय? मग करु नका 'ही' चूक, अन्यथा स्नॅक्सवर द्यावा लागेल 18% GST

Cinema पाहायला जाताय? मग करु नका 'ही' चूक, अन्यथा स्नॅक्सवर द्यावा लागेल 18% GST

थिएटरमध्ये स्वस्त पॉपकॉर्न आणि कोला ड्रिंक्सचा आनंद घ्यायचा असेल, तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. असं केल्याने तुम्हाला द्यावा लागणारा अधिकचा जीएसटी टाळता येऊ शकतो.

जाहिरात

सिनेमा स्नॅक्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जुलै : आपण सिनेमा पाहायला जातो तेव्हा अत्यंत महागड्या किंमतीत आपल्याला स्नॅक्स खरेदी करावे लागतात. मात्र आता सिनेमा हॉलमध्ये मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांपासून काहीसा दिलासा मिळालाय. मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आलाय. चित्रपटगृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटी दरात थेट 13 टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच दिलासा मिळेल. पण यामध्ये एक पेच आहे. कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला यावर 18 टक्के जीएसटी भरावाच लागेल. ते नेमकं काय आहे आणि कोणती चूक करु नये हे अवश्य जाणून घ्या. जीएसटी कौन्सिलने सिनेमा हॉलमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर जीएसटी कमी करून तुम्हाला दिलासा दिलाय. पण तुम्हाला हा दिलासा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही थिएटर किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाण्यापिण्याची खरेदी कराल. जर तुम्हाला चित्रपटाची तिकिटे ऑनलाइन बुक करण्याची आणि खाण्यापिण्याच्या कॉम्बो ऑफरची सवय असेल, तर तुम्हाला याचा फायदा मिळू शकणार नाही. चित्रपटगृहे चित्रपटाच्या तिकिटांसह खाण्यापिण्याच्या कॉम्बो ऑफर देतात. जीएसटी कौन्सिलने स्पष्ट केलेय की कॉम्बो प्लॅनमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थांवरील कर तिकिटांवर लागू होईल तसाच राहील. त्यामुळे तिकीट बुक करताना ही गोष्ट चुकूनही विसरु नका. ITR: घरभाडं मिळत असेल तर द्यावा लागेल टॅक्स, पण या ट्रिकने बचावासाठी करता येतं जुगाड पण असं का? कॉम्बो ऑफरवर जीएसटी कपात नाही. कारण तुम्ही ऑनलाइन अॅप किंवा वेबसाइटवरून चित्रपटाचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला कॉम्बो ऑफरचा पर्याय मिळतो. तिकिटासह तुम्ही जेवण आणि ड्रिंग्स अडव्हान्समध्ये बुक करू शकता. पण असे केल्यास जीएसटी कपातीचा लाभ मिळणार नाही. जीएसटी कौन्सिलने स्पष्ट केले आहे की थिएटरच्या काउंटरवर विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांवरच 5% जीएसटी लागू होईल. मात्र तुम्ही तिकिटासह फूड बुक करता तेव्हा त्यासाठी एकच बिल तयार होते आणि तिथेच GST लागू होतो. त्यामुळे चित्रपट तिकीटावर असतो. Income Tax रिफंडचे 5 नियम, तुम्हाला माहिती असायलाच हवेत, येणार नाही कोणताच प्रॉब्लम! अशा प्रकारे तुम्ही स्वस्त पॉपकॉर्न खरेदी करू शकता चित्रपटाचं तिकीट ऑनललाइन बुक करा किंवा तिथे जाऊन बुक करा. फक्त खाद्य पदार्थ तिथल्या फूड काउंटरवरुन बुक करा. असं केलं तरच तुमच्यावर पदार्थांवर फक्त 5 टक्के कर आकारला जाईल. कारण तिकीट आणि जेवणाचे बिल वेगळे असेल. म्हणजे थोडा स्मार्टनेस दाखवला तर चित्रपट पाहताना तुम्ही खूप बचत करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या