क्रेडिट कार्ड
Credit Card : सध्याच्या काळात बाजारात अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. तसं पाहिलं तर आपल्या गरजेनुसार वेगवेगळे क्रेडिट कार्ड असतात. पेट्रोलसाठी, मूव्हीसाठी, खाण्या-पिण्यासाठी, फिरण्यासाठी आणि शॉपिंगसाठी असे विविध क्रेडिट कार्ड असतात. प्रत्येक कॅटेगिरीसाठी क्रेडिट कार्डची एक लांबच रांग आहे. यामध्ये अनेक क्रेडिट कार्डवर कॅशबॅक, ट्रेव्हल बेनिफिट्सपासून रिवॉर्ड पॉइंट्सही मिळतात. अशावेळी सर्वांनाच क्रेडिट कार्डचा वापर करण्याची इच्छा असते. पण आज आपण अशा तीन पद्धती पाहणार आहोत. ज्याचा वापर केल्यास तुम्ही क्रेडिट कार्डवरुन जास्त पैसे वाचवू शकता.
आपल्या गरजेनुसार घ्या कार्ड आपल्याला माहीत आहे की, प्रत्येक प्रकारच्या गरजांसाठी वेगवेगळे क्रेडिट कार्ड असते. अशा स्थितीत क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या कामासाठी जास्त खर्च करता ते पहा. त्यानंतर त्यानुसार क्रेडिट कार्ड घ्या, ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल. तुमचा प्रवासासाठी खूप खर्च होत असेल तर पेट्रोल किंवा ट्रॅव्हल कार्ड घ्या. तसंच तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर शॉपिंग कार्ड घ्या. अशा प्रकारे तुम्ही त्या कार्डवर अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकाल. तुम्ही ट्रॅव्हलचं कार्ड घेऊन त्यामधून कपडे खरेदी केले किंवा पेट्रोल भरलं तर कमी फायदा मिळेल. पण गरजेनुसार क्रेडिट कार्ड घेऊन त्यानुसार पेमेंट केली तर फायदाच फायदा मिळू शकतो. High Speed Train: दिल्ली ते मुंबई फक्त 3 तासात! भारतात ही ट्रेन सुरु झाली तर कोणीच पकडणार नाही फ्लाइट 2- रिवॉर्ड पॉइंट्सचा गेम देखील घ्या समजून घ्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु अनेकांना हे समजत नाही की रिवॉर्ड पॉइंट वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रांझेक्शनवर वेगळ्या पद्धतीने उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, डायनिंगमध्ये 100 रुपये खर्च केल्यास तुम्हाला 10 रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. तर इतर गोष्टींवर, तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांवर फक्त 2 रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. रिवॉर्ड पॉइंट्स कुठे जास्त मिळतात हे तुम्हाला आधीच माहीत असेल, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी क्रेडिट कार्डचा जास्त वापर कराल. क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी, रिवॉर्ड पॉइंटच्या बदल्यात तुम्हाला काय मिळते हे देखील जाणून घ्या. काही बँका 4 रिवॉर्ड पॉइंट्सवर 1 रुपये देतात, तर काहींची गणना वेगळी असते. काही केवळ रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी शॉपिंगचा ऑप्शन देतात. ते पैसे देत नाहीत. दुसरीकडे, जे रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात पैसे देतात ते त्यांची पूर्तता करण्यासाठी काही चार्ज देखील आकारतात. SBI ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता स्कॅन करुनही ATM मधून काढता येतील पैसे 3- सण-उत्सवांना येणाऱ्या डिल्सवर नजर ठेवा तुम्हाला क्रेडिट कार्डचा खरा फायदा घ्यायचा असेल, तर सणांच्या काळात सर्व क्रेडिट कार्डवर येणार्या डीलवर नजर ठेवा. या दरम्यान, तुम्हाला कार्डने केलेल्या खरेदीवर 5%, काहींकडून 10% आणि काहींकडून 15-20% सूट किंवा कॅशबॅक मिळेल. अशा वेळी, या क्रेडिट कार्डांच्या मदतीने तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू अतिशय स्वस्तात मिळू शकतात. त्याच वेळी, अशा वेळी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. पण, लक्षात ठेवा की या ऑफर फार कमी कालावधीसाठी आहेत, त्यामुळे वेळेत त्यांचा लाभ घ्या.