मुंबई, 18 सप्टेंबर : अडचणीच्या वेळी आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा मोठी धावाधाव होते. पैसे नेमके कुठून उभे करावे असा प्रश्न अनेकांना असतो. अशावेळी आधारकार्डच्या मदतीने तुम्ही कर्जही सहज मिळवू शकता. याबाबत माहिती घेऊयात. वैयक्तिक कर्ज हा एक अतिशय सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पैशांची व्यवस्था करू शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना आधार कार्डवर सहजपणे कर्ज देतात. ITR Refund: आयकर परतावा अजून आला नाही तर काय कारणं असू शकतात? चेक करा सद्यस्थिती सिबिल स्कोअर चांगला असावा कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर नीट तपासा. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर त्याला सहज कर्ज मिळते. यासोबतच बँक अशा परिस्थितीत कमी व्याजदरही आकारते. आजकाल बहुतेक मोठ्या बँका आणि वित्त कंपन्या KYC नंतर वैयक्तिक कर्ज सहजपणे मंजूर करतात. Senior Citizen Saving Scheme: ‘या’ बचत योजनेद्वारे दरवर्षी होऊ शकते 2 लाखांची कमाई, समजून घ्या सविस्तर आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज » कर्जाचा अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. » तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपवरही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. » यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP मिळेल. » तेथे वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडा आणि पुढे कर्जाची रक्कम भरा. » येथे तुम्ही तुमची जन्मतारीख, पत्ता इत्यादी इतर माहिती भरा. » यानंतर आधार आणि पॅन सारख्या आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करा. » शेवटी आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर बँक तुमच्या तपशीलांची पडताळणी करेल. » यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.