JOIN US
मराठी बातम्या / मनी / Umang App: केवळ एका App द्वारे घेता येईल अनेक सरकारी सुविधांचा लाभ, असे होतील फायदे

Umang App: केवळ एका App द्वारे घेता येईल अनेक सरकारी सुविधांचा लाभ, असे होतील फायदे

उमंग App सरकारकडून लाँच केलं गेलेलं एक मल्टीपर्पज App आहे, ज्याद्वारे युजर्स अनेक प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ केवळ एका क्लिकवर घेऊ शकतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 मे : अनेकदा लोकांना विविध सरकारी योजनांची माहिती नेमकी कुठून मिळवावी याची माहिती नसते. अशात एक असं App आहे जे तुमची मदत करू शकतं. Umang App यासाठी तुमची मदत करू शकतं. उमंग App सरकारकडून लाँच केलं गेलेलं एक मल्टीपर्पज App आहे, ज्याद्वारे युजर्स अनेक प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ केवळ एका क्लिकवर घेऊ शकतात. डिटीटल पेमेंटपासून अनेक योजनांचा लाभ इन्कम टॅक्स रिटर्न, आधार कार्ड सर्विस, EPFO माहिती अशी माहिती घेता येते. तसंच गॅस सिलेंडरपासून पासपोर्ट सर्विससारख्या सुविधाही घेता येतात. उमंग App नॅशनल ई-गवर्नन्स डिव्हिजन आणि इलेक्ट्रॉनिक्स (NeGD) आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून बनवण्यात आलं आहे. याअंतर्गत युजर्स स्वत:ला रजिस्टर्ड करुन अनेक सुविधांची माहिती घेऊ शकतात.

हे वाचा -  आता ऑफिसमध्ये दररोज अर्धा तास झोपू शकतात कर्मचारी, या भारतीय कंपनीची मोठी घोषणा

काय आहेत फायदे - Umang App सरकारकडून बनवण्यात आलेलं एक मोबाइल App आहे, जे ऑल-इन-वन सिंगल, यूनिफाइड, सुरक्षित, मल्टी-चॅनल, मल्टी-प्लॅटफॉर्म, मल्टी लँग्वेजची सुविधा देतं. या App द्वारे तुम्ही एम किसान, सीबीएसीसारख्या 127 विभाग आणि इतर सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता.

हे वाचा -  आधार कार्ड हरवलं तरी टेन्शन नाही, मोबाईलमध्ये डाउनलोड करा mAadhaar app; मिळणार अनेक फायदे

कसं कराल रजिस्टर्ड - - सर्वात आधी प्ले स्टोरवरुन Umang App डाउनलोड करावं लागेल. - त्यानंतर लॉगइन करावं लागेल. - रजिस्टर्ड करुन प्रोसीड करावं लागेल. - आता मोबाइल नंबर टाकून mPin सेट करा. - प्रोफाइल इन्फॉर्मेशन स्क्रिनवर क्लिक करा. - इथे हवी असलेली सर्व माहिती भरा. - Save and Proceed वर क्लिक करा. - त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल. - त्यानंतर तुम्ही e-KYC प्रोसेसही पूर्ण करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या