JOIN US
मराठी बातम्या / मनी / लग्न, बर्थडे किंवा बारसं, सगळीकडे पैसाच पैसा! सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल 8 लाखांपर्यंत कमाई

लग्न, बर्थडे किंवा बारसं, सगळीकडे पैसाच पैसा! सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल 8 लाखांपर्यंत कमाई

Dj Business in India: डीजे बिझनेसची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे, विशेषत: तरुण वर्गानं हा व्यवसाय करण्यात जास्त रस दाखवला आहे. त्यामुळं तुम्हालाही संगीताची आवड आणि समज असेल तर तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता.

जाहिरात

लग्न, बर्थडे किंवा बारसं, सगळीकडे पैसाच पैसा! सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल 8 लाखांपर्यंत कमाई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 नोव्हेंबर: एखादा लग्न समारंभ असो किंवा इतर कार्यक्रम चांगलं म्यूजिक नसेल तर त्याची मजा जाते. लग्न किंवा मिरवणूका म्यूजिकशिवाय अपूर्ण वाटते. प्री-वेडिंग, बॅचलर पार्टी असो किंवा बर्थडे पार्टी कोणत्याही प्रोग्रामला चार चांद लागतात ते म्युजिकमुळंच.. एकदा का म्युजिक सुरु झालं की लोकांचे पाय थिरकायला लागतात आणि आपोआपच कार्यक्रम यशस्वी होतो. म्हणूनच डान्स आणि म्युजिक लव्हर्स केवळ लग्नसमारंभातच नव्हे तर वाढदिवस, वर्धापनदिन असा कोणताही कार्यक्रम असो, अशाप्रसंगी डीजेला आमंत्रित करायला विसरत नाहीत. त्यामुळं गेल्या काही काळात डीजेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डीजे व्यवसायाबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ असून विशेषत: तरुणांनी हा व्यवसाय करण्यात अधिक रस दाखवला आहे. त्यामुळे तुम्हालाही संगीताची आवड आणि समज असेल तर तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकता. 8 लाख रुपये कमवू शकतात- समजा एखाद्या कार्यक्रमासाठी तुमच्या डीजेचे एका दिवसाचे भाडे 10,000 रुपये आहे. 365 दिवसांपैकी 80 दिवसांसाठी जरी तो बुक केला गेला तर त्यानुसार 10,000x80 म्हणजेच तुम्ही आठ लाख रुपये कमवू शकता. यामध्ये तुमचे मनुष्यबळ, वाहतूक आणि इतर खर्चाचाही समावेश होतो. डीजे व्यवसाय कसा सुरू करायचा? आजच्या काळात जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात डीजेची उपस्थिती असते. त्याची लोकप्रियता देखील खूप वाढत आहे, हेच कारण आहे की सध्या डीजे सेवेची मागणी खूप वाढली आहे आणि हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय बनला आहे. हे सुरू करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह, ते चालवण्याचे कौशल्य देखील आवश्यक आहे. तुम्हाला डीजे ऑपरेट करायला यायलाच हवा असंही नाही, त्यासाठी तुम्ही ऑपरेटरदेखील कामावर ठेवू शकता. परंतु ही उपकरणं तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतल्यास आणि ती योग्यरित्या चालवायला शिकलात तर तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. हेही वाचा:  Credit Card Tips: क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवायचंय? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात आवश्यक उपकरणं- डीजे व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सीडी प्लेयर, लॅपटॉप, अॅम्प्लीफायर, डीजे मिक्सर, डीजे लाईट, साउंड सिस्टम, मायक्रोफोन, डीजे ट्युटेबल, म्युझिक ट्यून, डीजे डान्स फ्लोर आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार त्यांच्या उपकरणांची गुणवत्ता निवडू शकता. तुमच्या गुंतवणुकीच्या बजेटनुसार तुम्ही त्यांना सेकंड हँड देखील खरेदी करू शकता. अंदाजे किंमत- डीजे सेवेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 3 ते 4 लाख रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय या व्यवसायांतर्गत तुमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी तुम्हाला काही मनुष्यबळ आणि वाहतुकीचा खर्चही सहन करावा लागतो. तथापि ते वेळ आणि स्थानावर अवलंबून असते.

अशी नोंदणी करा- डीजेचा व्यवसाय कोणत्याही स्तरावर सुरू करण्यासाठी त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. या व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी प्रथम तुम्हाला स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. ज्यांचा व्यवसाय नोंदणीकृत आहे त्यांच्यावर ग्राहकांचा अधिक विश्वास असल्याचं अनेक वेळा दिसून येतं. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला पेमेंट दिलं जातं, तेव्हा ग्राहक तुमच्याकडून बिल देखील मागू शकतो. यासाठी तुम्हाला जीएसटी नोंदणी देखील करावी लागेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या उपकरणांचा विमा देखील काढू शकता. त्यामुळं मालाचं नुकसान किंवा चोरी झाल्यास तुम्हाला जास्त नुकसान सहन करावे लागणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या