JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता क्रेडिट कार्डने भरु शकता घरभाडे, जाणून घ्या PhonePe च्या माध्यमातून रेंट पेमेंटची प्रोसेस

आता क्रेडिट कार्डने भरु शकता घरभाडे, जाणून घ्या PhonePe च्या माध्यमातून रेंट पेमेंटची प्रोसेस

PhonePe अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भाडे भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क देखील आहे, परंतु तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनीकडून कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात.

जाहिरात

PhonePe

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जानेवारी: देशातील अनेक कंपन्यांनी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा सुरू केली आहे. आज बाजारात CRED, Nobroker, Payzapp, RedGirraffe, Paytm असे अनेक मोबाईल अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे तुमचे भाडे भरू शकता. तुम्हाला माहिती आहे का की, डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून घराचे भाडे भरु शकता. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. PhonePe अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी 2 टक्के एक्सट्रा चार्ज भरावा लागेल. पण तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. म्हणजेच, 10,000 रुपयांच्या भाड्याच्या पेमेंटवर, तुम्हाला 10,200 रुपये द्यावे लागतील. तसेच, UPI द्वारे भाडे भरण्यासाठी कोणतेही एक्सट्रा चार्ज नाही.

आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस

संबंधित बातम्या

PhonePe अ‍ॅपवर रेंट पेमेंटची प्रोसेस

-पहिले PhonePe अ‍ॅप अपडेट करा. -यानंतर PhonePe अ‍ॅप उघडा आणि रिचार्ज आणि पे बिल विभागात See All वर क्लिक करा. -आता Utilities विभागात तुम्हाला Rent Paymen चे ऑप्शन दिसेल. -रेंट पेमेंट वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला चार पर्याय दिसतील - घर/दुकान भाडे, सोसायटी मेंटेनन्स, ब्रोकर पेमेंट आणि प्रॉपर्टी डिपॉझिट. -घर/दुकान भाड्यावर क्लिक केल्यानंतर, घरमालक/लाभार्थीचे बँक अकाउंट डिटेल्स किंवा UPI आयडी तेथे टाका. -यानंतर भाड्याची रक्कम टाका. -आता पेमेंट मोडमध्ये क्रेडिट कार्ड निवडा. -भाड्याची रक्कम घरमालक/बेनिफिशियरीच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाईल. फिरायला जायचा प्लान करताय? IRCTC चा काश्मीर प्लान अवश्य पाहा, मिळतील ‘या’ सुविधा!

क्रेडिट कार्डने भाडे भरण्याचे फायदे

-क्रेडिट लिमिट वापरून तुम्ही तुमची कॅश बचत करू शकता. क्रेडिट कार्डची देय रक्कम साधारणपणे 45-50 दिवसांनंतर दिली जाते. अशा प्रकारे, आपण भाड्याचे पैसे कुठेतरी गुंतवून काहीतरी कमवू शकता. -क्रेडिट कार्डद्वारे केलेले व्यवहार तुम्ही ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. याचा अर्थ तुम्ही EMI द्वारे भाडे देखील भरू शकता. -क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्सही उपलब्ध आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या