JOIN US
मराठी बातम्या / मनी / Paytm वरुन क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला भरता येतं का? ही आहे सोपी प्रोसेस

Paytm वरुन क्रेडिट कार्ड बिल तुम्हाला भरता येतं का? ही आहे सोपी प्रोसेस

भारतात आर्थिक सेवा पुरवणाऱ्या भारतीय बँकांसोबतच विदेशी बँकाही क्रेडिट कार्ड ऑफर करतात. क्रेडीट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे त्यांचा वापर देशात खूप वाढला आहे. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर, कार्डधारकाला ठराविक वेळेत बिल भरावे लागते.

जाहिरात

पेटीएमवरुन असं करा क्रेडिट कार्ड पेमेंट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : भारतात आर्थिक सेवा पुरवणाऱ्या भारतीय बँकांसोबतच विदेशी बँकाही क्रेडिट कार्ड ऑफर करतात. क्रेडीट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे त्यांचा वापर देशात खूप वाढला आहे. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर, कार्डधारकाला ठराविक वेळेत बिल भरावे लागते. लोकांकडे क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी काही डेडिकेटेड मोबाइल अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, तुम्ही पेटीएम, फोनपे सारख्या ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सद्वारे क्रेडिट कार्ड बिल देखील भरू शकता. येथे आम्ही तुम्हाला Paytm वरून क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सोपी प्रोसेस सांगत आहोत.

मोबाईल चोरी झाला? कसं डिअ‍ॅक्टिव्हेट कराल UPI अकाउंट? फॉलो करा सिंपल स्टेप्स

पेटीएमने क्रेडिट कार्ड बिल कसं भरावं

-सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर Paytm अ‍ॅप उघडा. -अ‍ॅपच्या होमपेजवर खाली स्क्रोल केल्यावर, तुम्हाला रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागात क्रेडिट कार्ड पेमेंटचा पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. -क्रेडिट कार्ड पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अ‍ॅपमध्ये एक नवीन पेज उघडेल. -या नवीन पेजवर, तुम्हाला तुमचा 16 अंकी क्रेडिट कार्ड नंबर टाकावा लागेल. -कार्ड नंबर एंटर केल्यानंतर, पेटीएम मोबाइल अ‍ॅप तुमच्या क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक आणि पेमेंट नेटवर्कचा Logo दिसेल. -बँक आणि पेमेंट नेटवर्क चेक केल्यानंतर, तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे Proceed वर क्लिक करावे लागेल. -Proceed वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा Proceed वर क्लिक करावे लागेल. -आता तुम्हाला Confirm आणि Proceed वर क्लिक करून तुमची पेमेंट कन्फर्म करावी लागेल. -यानंतर, तुम्हाला पेटीएम अ‍ॅपवर क्रेडिट कार्ड बिल पेमेंट मोड सेलेक्ट करावा लागेल जिथून तुम्हाला बिल भरायचे आहे. -आता तुम्हाला पे बटणावर क्लिक करावं लागेल आणि तुमचा UPI पिन टाकावा लागेल, त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरले जाईल.

यावेळी तुम्हाला किती Income Tax भरावा लागणार? असं करा कॅल्क्यूलेट

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या