JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुमच्या नकळत PAN Cardचा गैरवापर केलाय का कसं कळेल? फसवणूक टाळण्यासाठी काय कराल

तुमच्या नकळत PAN Cardचा गैरवापर केलाय का कसं कळेल? फसवणूक टाळण्यासाठी काय कराल

फॉर्म 26A दरवर्षी आयकर विभागाला माहिती देतो. यामध्ये आयकर रिटर्न आणि पॅन कार्ड क्रमांक यांसारख्या आयकर संबंधित रेकॉर्डमधून केलेले सर्व आर्थिक व्यवहार समाविष्ट आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : पॅन कार्डच्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तुमच्या पॅनचा परस्पर वापर करुन अनेकांची फसवणूक झाली आहे. तुमच्या पॅनचा कोणी गैरवापर केला आहे का हे तुम्हाला कळू शकते. तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर झाला आहे की नाही हे तुम्ही अशा प्रकारे जाणून घेऊ शकता. पॅनवर कर्ज घेतले हे कसे कळणार? CIBIL स्कोर तपासून तुमच्या पॅनचा वापर करुन कर्ज घेतले असल्यास कळेल. CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark द्वारे, कुणी तुमच्या नावावर कर्ज घेतले आहे की नाही हे शोधू शकता. पेटीएम किंवा बँकबाझार सारखे फिनटेक प्लॅटफॉर्म देखील आर्थिक अहवाल वेरिफाय करण्याचा पर्याय देतात. ते ग्राहकांना झटपट CIBIL स्कोर देतात. पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमचे पैसे करेल डबल, सुरक्षिततेचीही हमी फॉर्म 26A वापरा फॉर्म 26A दरवर्षी आयकर विभागाला माहिती देतो. यामध्ये आयकर रिटर्न आणि पॅन कार्ड क्रमांक यांसारख्या आयकर संबंधित रेकॉर्डमधून केलेले सर्व आर्थिक व्यवहार समाविष्ट आहेत. फॉर्म 26A तपासून तुम्ही तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का हे शोधू शकता आणि त्यानंतर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. PFचे पैसे जमा झाले नाहीत तर घाबरू नका, तक्रार कशी कराल जाणून घ्या फॉर्म 26A कसा डाउनलोड करणार? » ‘ई-फायलिंग’ पोर्टलवर लॉग इन करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या » ‘My Account’ मेनूवर जा, नंतर फॉर्म 26AS (टॅक्स क्रेडिट) शोधा आणि लिंकवर क्लिक करा » डिलक्लेमर वाचल्यानंतर ‘कन्फर्म’ वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला TDS-CPC पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. » TDS-CPC पोर्टलवरील ‘Agree’ बटणावर क्लिक करा » ‘Proceed’ बटणावर क्लिक करा » View Tax Credit (फॉर्म 26AS) बटणावर क्लिक करा » तुमचे मूल्यांकन वर्ष निवडा आणि नंतर ‘View Type’ (HTML, text किंवा PDF) वर क्लिक करा. येथे तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही पर्यायावर क्लिक करू शकता. » ‘View / Download’ बटणावर क्लिक करा. तुम्हाला फॉर्म मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या