Addhar Card: आधार कार्ड नसेल तरीही मिळेल सरकारी अनुदान, काय आहे नियम? वाचा सविस्तर
मुंबई, 16 ऑगस्ट: आधार कार्ड (Aadhar Card) हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे, ज्याचा उपयोग प्रत्येक सरकारी योजनेत लाभ घेण्यासाठी केला जातो. तर दुसरीकडं आधार कार्ड नसल्यामुळं अनेकजण सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. ते सरकारी अनुदानाचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हालाही सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या आठवड्यात केंद्र आणि राज्याला जारी केलेल्या परिपत्रकात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार कायद्याच्या कलम 7 ची माहिती दिली. त्यानुसार आधार नसलेली कोणतीही व्यक्ती आधार नावनोंदणीसाठी अर्ज करू शकते. नावनोंदणीनंतर त्या व्यक्तीला एक नोंदणी क्रमांक मिळतो. जोपर्यंत आधार कार्ड मिळत नाही, तोपर्यंत या नोंदणी क्रमांकाचा वापर व्यक्तीला शासकिय लाभ, अनुदान किंवा सेवा मिळवण्यासाठी पर्यायी आणि व्यवहार्य माध्यम म्हणून करता येऊ शकतो.परिपत्रकानुसार, जर एखाद्या व्यक्तीला आधार क्रमांक मिळाला नसेल, तर त्याने/तिने नावनोंदणीसाठी अर्ज करावा आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला आधार क्रमांक मिळत नाही तोपर्यंत त्याची आधार नोंदणी ओळख (EID) क्रमांकाने केली जाईल. आधार येईपर्यंत तुम्ही आधार नोंदणी क्रमांक वापरून सबसिडी आणि सेवा मिळवू शकता. या कागदपत्रांवर तुम्ही सबसिडीचा लाभ घेऊ शकता-
हेही वाचा: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी SBI ची खास योजना, फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर
ही ओळखपत्रेही आवश्यक- सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, आधार कार्ड व्यतिरिक्त, भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र, आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड, पासपोर्ट, मोटार वाहन कायदा, 1988 (1988 चा 59) अंतर्गत वाहन चालविण्याचा परवाना. राजपत्रित अधिकार्याद्वारे जारी केलेले ओळखपत्र वापरू शकता, ज्यात व्यक्तीचा फोटो आणि राज्य सरकारने निर्दिष्ट केलेल्या इतर कोणत्याही कागदपत्रांचा समावेश आहे.