JOIN US
मराठी बातम्या / मनी / PF चे व्याजाचे पैसे लवकरच खात्याच जमा होणार; तुम्हाला किती पैसे आले कसं चेक कराल?

PF चे व्याजाचे पैसे लवकरच खात्याच जमा होणार; तुम्हाला किती पैसे आले कसं चेक कराल?

पीएफ खात्यात येणाऱ्या व्याजाच्या पैशांची माहिती घेण्यासाठी तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही शिल्लक तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 सप्टेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी कामाची बातमी आहे. EPFO सदस्य जे दीर्घकाळापासून त्यांच्या खात्यात व्याज येण्याची वाट पाहत आहेत, त्यांचे व्याजाचे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जाऊ शकतात. यावर्षी खातेदारांना 8.1 टक्के दराने व्याज मिळेल, जे गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी आहे. सरकार सुमारे 6 कोटी खातेधारकांच्या खात्यावर व्याजाचे पैसे पाठवणार आहे. पीएफ खात्यात येणाऱ्या व्याजाच्या पैशांची माहिती घेण्यासाठी तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही शिल्लक तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता. मोबाईलवर घरी बसून तुमची PF शिल्लक तपासण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत माहिती घेऊ. मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्स चेक करता येईल यूएएन पोर्टलवर रजिस्टर मेंबर्सना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील बॅलेन्स तपासता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. TATA ग्रुप 18 वर्षांनंतर IPO आणण्याच्या तयारीत; ‘ही’ कंपनी शेअर बाजारात होणार लिस्ट? मेसेजद्वारे बॅलेन्स तपासा मेसेजद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे गरजेचं आहे. Umang App च्या वर चेक करा तुमचे उमंग App उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विसवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड एंटर करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलेन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता.

Business Loan: ‘या’ सरकारी योजनच्या मदतीन सुरु करा बिझनेस, 75 टक्क्यांपर्यंत लोन मिळेल

संबंधित बातम्या

वेबसाइटवर तपासा बॅलेन्स

Epfindia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या