मुंबई : कोरोनानंतर डिजिटल पेमेंटचा वापर खूप जास्त वाटला आहे. त्यामुळे आता बरेच जण UPI पेमेंट वापरतात. बऱ्याचदा असं होतं की आपला UPI पेमेंट एकच ठेवतो ज्यामुळे तो हॅक होण्याचा धोका असतो. काहीवेळा आपले मित्र मैत्रिणी किंवा अनोळखी व्यक्ती UPI पेमेंटचा पिन पाहून आपल्या फोनचा गैरवापर करू शकतात. अशावेळी तुम्ही तुमचा UPI नंबर देखील बदलू शकता. UPI म्हणजे तुम्ही गुगल पे किंवा फोन पेचा पिन अगदी सहज बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करायची आहे याबाबत आम्ही तुम्हाला अगदी सोप्या शब्दात माहिती देणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल पे लॉगइन करायचं आहे. उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल दिसेल त्यावर क्लीक करा. नवीन विंडो सुरू होईल, त्यानंतर बँक खातं असा खाली पर्याय असेल. तुमच्या बँक खात्यावर क्लीक करा.
PFF खात्यावर लोन घ्यायचं, किती मिळतं आणि काय आहेत नियम?बँक खात्यावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला UPI आयडी मॅनेज, UPI मेंबर्स मॅनेज, डिस्प्ले QR कोड आणि खाली फरगेट UPI पिनवर जा. तिथे क्लीक केल्यावर तुम्हाला ATM कार्डचा नंबर आणि माहिती अपलोड करायची आहे. तुमचा पीन पुढे सेट करायचा पर्याय मिळेल. फोन पेमध्ये तुम्ही लॉगइन केल्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर क्लीक करा. तिथे गेल्यानंतर नवीन विंडो सुरू होईल. तिथे खाली चेंज पासवर्डचा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही पासवर्ड बदलू शकता.
कोणती काळजी घ्या तुमचा फोन कोणाच्या हातात देऊ नका तुम्ही UPI पिन अपलोड करताना कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना याकडे लक्ष द्या तुमचा UPI पिन कोणालाही सांगू नका शक्यतो कोणाला दिसेल असा UPI पिन टाकून पेमेंट करू नका तुमच्या फोनचा पासवर्ड बदलत राहा दुसऱ्याच्या हातात फोन दिल्यानंतर तुमच्या फोनवरून ती व्यक्ती UPI पेमेंट करणार नाही ना याची खबरदारी घ्या