JOIN US
मराठी बातम्या / मनी / क्रेडिट कार्ड वापरताय? या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त चार्ज

क्रेडिट कार्ड वापरताय? या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त चार्ज

अनेक जण पैसे देताना क्रेडिट कार्डाचा वापर करतात. जर तुम्ही अगदी शिस्तीने क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला व्याजमुक्त कर्जाचा चांगला फायदा घेता येतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : सध्या अनेक जण लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी करतात. ई-कॉमर्स वेबसाइट्स, इंटरनेट, सेल, ऑफर्स-डिस्काउंट्स यामुळे तर अनावश्यक गोष्टींचीही खरेदी केली जाते. अनेक जण पैसे देताना क्रेडिट कार्डाचा वापर करतात. जर तुम्ही अगदी शिस्तीने क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला व्याजमुक्त कर्जाचा चांगला फायदा घेता येतो. क्रेडिट कार्ड देणारी बँक बिलिंग पिरेड संपल्यावर ग्राहकाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाठवते. यात त्या ठरविक काळात म्हणजे साधारण महिनाभरात ग्राहकाने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांची माहिती असते. तुम्ही ते तपासून पाहतच असाल पण याचबरोबर बँका तुम्हाला कुठाला अतिरिक्त चार्ज लावून तुमच्याकडून अधिक पैसे उकळत नाही ना हेही पहायला हवं. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवरील तुमच्या नाव, पत्ता आणि व्यवहारांव्यतिरिक्त बँकेनी अनधिकृत चार्जेस लावले नाहीत ना, बिलिंगमध्ये चुका नाहीत ना, बिल भरण्याची तारीख चुकलेली नाही ना अशा अनेक गोष्टी पैसे भरण्यापूर्वी तपासायला हव्यात. तुम्ही ठरवून दिलेल्या तारखेनंतर क्रेडिट कार्ड बिल भरलंत तर त्या रकमेवर व्याज लागू होतं. स्टेटमेंट जनरेट होण्याच्या तारखेवरून उशिरा पैसे भरल्याबद्दल किती रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे हे तुम्हाला तपासता येऊ शकतं. क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमधील महत्त्वाची आणखी एक तारीख म्हणजे ड्यू डेट म्हणजेच बँकेत पैसे जमा होण्याची तारीख. या तारखेपर्यंत पैसे बँक खात्यात जमा झाल्यास कुठलेही अतिरिक्त चार्ज लावत नाही. पण स्टेटमेंटवरील पैसे भरण्याची अंतिम तारीख ड्यु डेट नाही. कारण जर एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डचं बिल चेकने भरणार असेल, तर त्यांनी बिल भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी आठ दिवस हा चेक बँकेत भरणं गरजेचं आहे. कारण चेक भरल्यावर तो बँकेच्या खात्यात रक्कम जमा व्हायला वेळ लागतो. जर पैसे जमा व्हायला उशीर झाला तर बँक तुमचं बिल उशिरा भरलं गेलं असं दाखवून दंड आकारू शकतात.

(वाचा -  Gold Price Today: सोने-चांदी दरात आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण )

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, पेमेंट ड्यु डेटनंतर पेमेंट करण्यास ग्राहकाने तीन दिवसांपेक्षा अधिक काळ लावला तरच बँक त्या ग्राहकाला उशिरा बिल भरल्याचा दंड करू शकते. जर ड्यु डेट नंतरच्या तीन दिवसांच्या ग्रेस पिरेडनंतर ग्राहकानी बिल भरलं, तर ड्यु डेटपासून न भरलेल्या रकमेवर व्याज लागू होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बिलिंग सायकलसाठी ते स्टेटमेंट जनरेट झालंय ती तारीख. क्रेडिट कार्ड बिलाच्या दोन महिन्यांच्या स्टेटमेंट जनरेशन डेटमध्ये साधारणपणे 30 दिवसांचा काळ असतो. या काळातील सर्व व्यवहार स्टेटमेंटमध्ये दिसतात. त्या बिलिंग सायकलमधील एकून देय रक्कम ही तुमच्या बिलाची रक्कम असते. त्या आधीच्या महिन्यांमध्ये उशिरा पेमेंट केलं असेल तर त्याचा दंडही या रकमेत गृहित धरला जातो. मिनिमम अमाउंट ड्यु हीदेखील महत्त्वाची तारीख आहे. उशिरा बिल भरण्याचा दंड लागू नये म्हणून कमीतकमी जी रक्कम तारखेपूर्वी भरणं गरजेचं आहे ती रक्कम या रकान्यात लिहिलेली असते. पण कार्ड धारकांनी फक्त मिनिमम ड्यु अमाउंट भरली तरीही त्या दिवसापासून बँक थकबाकीच्या रकमेवर व्याज आकारायला सुरुवात करते आणि जोपर्यंत तुम्ही थकबाकी बँकेत भरत नाही तोपर्यंत ते व्याज आकारलं जातं. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा वापर योग्य पद्धतीने समजून घेऊनच केला गेला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या