प्रातिनिधीक फोटो
मुंबई, 6 ऑगस्ट : अनेकजण मोठ्या विश्वासाने आपले पैसे सुरक्षित राहावे यासाठी बँकेत ठेवतात. मात्र अनेकदा बँका बंद पडल्या की त्यांचे पैसेही अडकतात. अशा काही घटना देखील समोर आल्या आहेत. समजा तुम्ही ज्या बँकेत पैसे जमा केले आणि ती बँक बुडली तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील याची माहितीही आपल्याला असायला हवी. वर्षभरापूर्वीच्या नियमानुसार बँक बुडल्यास खातेधारकांना जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळायचे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा नियम बदलण्यासाठी अर्थसंकल्प 2021 मध्ये डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यात (DICGC) सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर कायदा बदलला आणि विम्याच्या रकमेची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली. सुमारे 28 वर्षानंतर, या विम्याच्या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली. डिपॉझिट इन्शुरन्स ही एक प्रकारची योजना आहे, ज्या अंतर्गत बँक बंद पडल्या ग्राहकांचे जास्तीत जास्त 5 लाख रुपये सुरक्षित राहतात. EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज या बदलानंतर, ठेवीदारांना बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेतून जाण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही, ते त्यांच्या ठेव रकमेवर दावा करू शकतात. जर बँक मॉरेटोरियममध्ये असेल तर ठेवीदार त्यांच्या रकमेवर DICGC कायद्यानुसार दावा करू शकतो. सोप्या भाषेत याचा अर्थ असा आहे की नवीन दुरुस्तीमुळे दीर्घकाळ स्थगिती असलेल्या बँकांच्या हजारो ठेवीदारांना दिलासा मिळेल. DICGC कायदा, 1961 च्या कलम 16(1) च्या तरतुदींनुसार, बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर, DICGC प्रत्येक ठेवीदाराला पैसे देण्यास जबाबदार आहे. त्याच्या ठेव रकमेचा 5 लाख रुपयांपर्यंत विमा असेल. तुमचे एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाते असल्यास, जमा रक्कम आणि व्याज सर्व खात्यांमध्ये जोडले जाईल आणि फक्त 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित समजल्या जातील. यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. Flight Ticket: राडाच! फक्त 9 रूपयांत परदेश प्रवास, ‘या’ एअरलाइननं आणल्यात जबरदस्त ऑफर्स पैसे जमा करण्यापूर्वी आवश्यक माहिती कोणत्याही बँकेची नोंदणी करताना, DICGC त्यांना एक छापील पत्रक देते, ज्यामध्ये ठेवीदारांना उपलब्ध असलेल्या विम्याची माहिती असते. कोणत्याही ठेवीदाराला याबाबत माहिती हवी असल्यास ते बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती घेऊ शकतात.