मुंबई: अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रविवारी (18 डिसेंबर) रोजी रोमहर्षक फुटबॉल मॅचनंतर ‘कतार फिफा वर्ल्ड कप 2022’ स्पर्धेची सांगता झाली. लिओनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर फायलन मॅचमध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला. तर, फ्रान्सच्या किलियन एम्बापेनंही आपल्या खेळाच्या बळावर चाहत्यांची वाहवा मिळवली. अनेक वर्षांची पूर्वतयारी आणि गुंतवणूक आवश्यक असलेल्या या स्पर्धेनं ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल’ला (फिफा) व्यावसायिक सौद्यांमधून सुमारे 7.5 अब्ज डॉलर्स मिळवून दिले. ही रक्कम 2018 मधील रशिया वर्ल्ड कपमध्ये झालेल्या कमाईपेक्षा 1 अब्ज डॉलर्सनं जास्त आहे. रविवारी झालेल्या फायनल मॅचमध्ये अतिरिक्त वेळेनंतर दोन्ही टीमचा स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. त्यामुळे मॅच पेनल्टी शूटआउटमध्ये गेली होती. तिथे एमिलियानो मार्टिनेझनं चांगला खेळ करून किंग्सले कोमनचा शॉट वाचवला. तर, ऑरेलियन चौआमेनीनं गोल न केल्यामुळे अर्जेंटिनानं फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. कतार फुटबॉल वर्ल्ड कप 2022 दरम्यान फिफानं किती बजेट ठेवलं होतं? कतार वर्ल्ड कप 2022 च्या चार वर्षांच्या सायकलसाठी, जगातील सर्वोच्च फुटबॉल प्रशासकीय मंडळ असलेल्या फिफानं अंदाजे एकूण 4.7 अब्ज डॉलर्स कमाईचा अंदाज लावला होता. रशियामध्ये झालेल्या वर्ल्ड कप सायकलमध्ये जेवढ्या रक्कमेचा अंदाज लावला होता तेवढीच ही रक्कम होती.
VIDEO : एम्बाप्पेच्या वेगाने सगळेच थक्क, 97 सेकंदात दोन गोलने अर्जेंटिनाला भरली होती धडकी2022 मधील सुमारे 4.7 अब्ज डॉलर्सच्या रिव्हेन्यु बजेटपैकी, फिफानं डिसेंबर 2020 अखेरपर्यंत सुमारे 3.8 दशलक्ष डॉलर्सचे व्यावसायिक करार केले होते. ही रक्कम एकूण उद्दिष्टाच्या सुमारे 82 टक्के होती. 16 डिसेंबर रोजी फिफा कौन्सिलला सादर करण्यात आलेल्या पुढील चार वर्षांच्या अर्थसंकल्पानुसार, 2026 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 11 अब्ज डॉलर्स इतकी एकूण कमाई अपेक्षित आहे. ही स्पर्धा यूएस, मेक्सिको आणि कॅनडा या उत्तर अमेरिका खंडातील तीन देशांत होणार आहे. फिफाच्या वेबसाइटनुसार, वर्ल्ड कप हा फिफाच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे. तो दर चार वर्षांनी होतो. परिणामी महसूलाचा अचूनक अंदाज लावण्यास विलंब होतो. फिफानं किती कमाई केली आहे? फिफानं कतार वर्ल्ड कप 2022 दरम्यान कमर्शिअल डील्समधून सुमारे 7.5 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. ही रक्कम 2018 मधील रशिया वर्ल्ड कपमध्ये झालेल्या कमाईपेक्षा 1 अब्ज डॉलर्सनं जास्त आहे. या फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या खर्चाच्या बचतीमुळे कमाईत वाढ दिसत आहे. कारण, संपूर्ण स्पर्धा एकाच शहरात आयोजित करण्यात आली होती. सर्व आठ स्टेडियम दोहा शहरातील 50 किलोमीटरच्या परिसरातच होती. त्यामुळे प्रवास खर्च आणि अतिरिक्त पायाभूत सुविधांचा खर्च कमी झाला. गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, फिफाच्या अधिकार्यांचा अंदाज आहे की, या खेळातील अतिरिक्त गुंतवणुकीतून सात लाख डॉलर्सचं उत्पन्न मिळेल. त्यातील तीन लाख डॉलर्स आपत्कालीन कोविड-19 निधीसाठी जमा होतील. फिफा रिव्हेन्यू ब्रेक अप: राईट्स सेलिंग आणि तिकीट रिव्हेन्यु फिफाची प्रामुख्यानं, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग राईट्स, मार्केटिंग राईट्स, हॉस्पिटॅलिटी राईट्स आणि तिकीट सेल्स, लायसनिंग राईट्स आणि इतर रिव्हेन्यू या पाच पद्धतीनं कमाई होते. 2022 मध्ये फिफाला मिळालेल्या एकूण महसुलामध्ये, सगळ्यात जास्त (56 टक्के) टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग राईट्सचा वाटा आहे. 29 टक्क्यांसह मार्केटिंग राईट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे तर इतर पद्धतीनं 15 टक्के महसूल मिळाला आहे.
FIFA Final : लढवय्या एम्बाप्पेसाठी राष्ट्राध्यक्षही हळहळले, मैदानावर जाऊन केलं सांत्वन, VIDEO VIRALफिफा वेबसाइटनुसार, 2022 फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग राईट्समधून 2.64 अब्ज डॉलर्स कमाई होईल, असं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मार्केटिंग राईट्स सेल्सचं एकूण बजेट 1.35 दशलक्ष डॉलर्स इतकं होते. तर, एका वर्षांसाठी लायनिंग राईट्स बजेट 140 दशलक्ष डॉलर्स इतकं होतं. जर्मनीतील स्पोर्ट्स आउटफिटर केलर स्पोर्ट्सच्या मते, 2018 रशिया वर्ल्ड कपच्या तुलनेत कतारमधील मॅचची तिकिटे 40 टक्क्यांनी महाग होती. फायनल मॅचच्या तिकिटांची किंमत सरासरी 684 पाउंड (जवळपास 66 हजार 200 रुपये) होती. 30 दशलक्षांहून अधिक तिकिटं आधीच विकली गेली होती. त्यामुळे एकूण तिकीट महसूल सुमारे 1 अब्ज डॉलर्स (286 पाउंड किंवा 340 डॉलर्स प्रति सीट) असल्याचा अंदाज आहे. 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये, फिफानं सध्याच्या उत्पन्नात जवळपास 50 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज मुख्यतः ब्रॉडकास्टिंग आणि स्पान्सरशीप डील्सशी संबंधित आहे. तसेच, स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या एनएफएल स्टेडियममधील तिकीट सेल्स आणि हॉस्पिटॅलिटीमधूनही हे उत्पन्न मिळेल.