JOIN US
मराठी बातम्या / मनी / आधार कार्डमध्ये तुम्ही किती वेळा बदल करू शकता? काय सांगतो नियम

आधार कार्डमध्ये तुम्ही किती वेळा बदल करू शकता? काय सांगतो नियम

मुंबई : आधार कार्ड हे भारतात आपली ओळख दाखवण्यापुरतं उरलेलं नाही. एका आधारवर तुमच्या बँक खात्यापासून ते तुमच्या आयुष्यातील प्राथमिक माहितीपर्यंत सगळ्या गोष्टी लिंक केल्या गेल्या आहेत. आधार नंबरवर सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. मात्र कधीकधी आधार कार्ड मध्ये काही कारणांनी बदल करावे लागतात. कधी फिंगरप्रिंट कधी फोटो, कधी पत्ता तर कधी नावात बदल करावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का? आधार कार्डमध्ये कितीवेळा बदल करता येतो? प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी आज आधार कार्ड मागतिलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आधार कार्ड हे भारतात आपली ओळख दाखवण्यापुरतं उरलेलं नाही. एका आधारवर तुमच्या बँक खात्यापासून ते तुमच्या आयुष्यातील प्राथमिक माहितीपर्यंत सगळ्या गोष्टी लिंक केल्या गेल्या आहेत. आधार नंबरवर सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. मात्र कधीकधी आधार कार्ड मध्ये काही कारणांनी बदल करावे लागतात. कधी फिंगरप्रिंट कधी फोटो, कधी पत्ता तर कधी नावात बदल करावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का? आधार कार्डमध्ये कितीवेळा बदल करता येतो? प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी आज आधार कार्ड मागतिलं जातं. अनेक वेळा आधार बनवताना काही माहिती अपूर्ण राहते, जी तुम्ही वेळीच दुरुस्त करू शकता, कार्डमध्ये तुमच्या नावाचे चुकीचे स्पेलिंग टाकले तर तुम्ही वेळीच त्यात सुधारणा करू शकता. या गोष्टीचा होऊ शकतो त्रास चुकीच्या माहितीचं आधार कार्ड वापरल्याने तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. आधारामध्ये सर्व माहिती असणे आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, आधार जारी करणारी संस्था, लोकांना वेळोवेळी त्यांचे आधार अपडेट करण्याचे आवाहन करत असते. आधार कार्ड जारी करणारी एजन्सी यूआयडीएआय आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर, लिंग इत्यादी माहिती बदलण्याची सुविधा दिली जाते.

Aadhar Card Update: UIDAI ची खास योजना, आता आधार कार्डमध्ये होणार मोठा बदल

कितीवेळा अपडेट करता येतं आधार? नाव किती वेळा बदलता येतं? आधार कार्डमध्ये नाव स्पेलिंग करताना चूक झाली असेल किंवा लग्नानंतर महिलांना आडनाव बदलायचं असेल तर ते करू शकतात. यूआयडीएआय ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही नाव बदलण्यास अनुमती देते. मात्र, नेम अपडेट्स फक्त दोन वेळाच करता येतं. जेंडर किती वेळा बदलता येतं? आधार कार्डवर जर तुमचं लिंग चुकीच्या पद्धतीने टाकलं गेलं असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. यूआयडीएआयच्या नियमानुसार त्यात बदल करता येतो. यूआयडीएआय आधार कार्डवर एकदाच ते अपडेट करता येतं.

आधारकार्डद्वारे फ्रॉड होण्याची भिती? तुमचा ई-मेल आयडी लिंक करा, प्रत्येकवेळी येईल Alert

संबंधित बातम्या

DOB किती वेळा बदलता येते? UIDAI च्या नियमानुसार तुम्ही तुमची जन्मतारीख चुकली असेल तर एकदाच बदलू शकता. दुसऱ्यांदा बदलण्याचा पर्याय तुम्हाला दिला जात नाही. दुसऱ्यांदा यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. त्यामुळे डेट ऑफ बर्थ चुकवू नका.

पत्ता तुमच्या आधार कार्डवरील घराचा पत्ता, मोबाईल नंबर, E mail, फोटो, फिंगर प्रिंट, रेटिना स्कॅन हे तुम्हाला अपडेट करायचे असतील तर तुम्ही कितीही वेळा ते करू शकता. कारण त्यासाठी कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला ते हवं तेवढे वेळा अपडेट करता येतात. मात्र प्रत्येकवेळी अपडेट करण्यासाठी 50 ते 60 रुपये भरावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या