नवी दिल्ली, 14 जानेवारी : आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry)आरोग्यविषयक सेवांबद्दलचा एक ड्राफ्ट केला आहे. दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकार दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी भरभक्कम मदत देणार आहे. लाभार्थींची यादी करणार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकस रिसर्च (ICMR)हे कौन्सिल आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींची एक यादी करेल आणि त्यापैकी दुर्धर आजार झालेल्या रुग्णांसाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. क्राउड फंडिंगद्वारे निधी याशिवाय गरजूंच्या मदतीसाठी आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी उभारला जाईल. त्याचबरोबर दुर्धर आजारांवरच्या उपचारांसाठी हॉस्पिटल निवडीतही मदत केली जाईल. आयुष्यमान भारत योजनेत गरीब कुटंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.सरकारने ऐच्छिक क्राउडफंडिंगसाठी एक वेगळा डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठीच डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (हेही वाचा : घर शोधताय? मग दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, सरकारने सुरू केली नवी सेवा) गरिबांच्या सेवेसाठी एखाद्याला गरजू रुग्णांना मदत करायची असेल तर व्यक्तिगत किंवा कॉर्पोरेट देणगीदार रुग्णांच्या उपचारांसाठी दान देऊ शकतील. आरोग्य मंत्रालयाने या मसुद्याबद्दल 10 जानेवारीपर्यंत सूचना मागवल्या होत्या. आयुष्यमान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. तिचा 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना फायदा व्हावा हे यामागचं उद्दिष्ट आहे. देशातल्या गरीब जनतेची सेवा करण्याच्या दिशेने उचललेलं हे एक पाऊल आहे, असं म्हटलं जातं. (हेही वाचा : SBI च्या 42 कोटी ग्राहकांना धक्का, FD वरचे व्याजदर घटवले) ==========================================================================================