JOIN US
मराठी बातम्या / मनी / मोदी सरकारचा मोठा निर्णय, या महत्त्वाच्या बँकेतील संपूर्ण भागीदारी विकणार

मोदी सरकारचा मोठा निर्णय, या महत्त्वाच्या बँकेतील संपूर्ण भागीदारी विकणार

आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) सरकारच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निर्गुंतवणूक विभागाकडून त्यांच्या वेबसाइटवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण रॉय, नवी दिल्ली, 09 जुलै: आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) सरकारच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निर्गुंतवणूक विभागाकडून त्यांच्या वेबसाइटवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सीएनबीसी आवाझचे (CNBC AWAAZ) प्रतिनिधी लक्ष्मण रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्गुंतवणूक विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करायला हवे. एक म्हणजे- स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणुकीकरता ट्रान्झॅक्शन अॅडव्हायजरसाठी फायनॅन्शिल बीडच्या अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे म्हणजे- आयडीबीआय बँकेतील भागीदारी विकण्यासंदर्भात जे काही अनुत्तरित प्रश्न आहेत त्यावर निर्गुंतवणूक विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान या अहवालानुसार आयडीबीआय बँकेमध्ये सरकारची असणारी 100 टक्के हिस्सेदारी (Govt now likely to sell entire stake in the bank) विकण्यासाठी CCEA कडून मंजुरी मिळाली आहे.

आयडीबीआय बँकेमध्ये सरकारची 45 टक्के भागीदारी आहे. एलआयसीकडून देखील संपूर्ण 49% भागभांडवलाची विक्री केली जाईल अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या