JOIN US
मराठी बातम्या / मनी / ONDC Portal: 'या' सरकारीवर पोर्टलवर अमेझॉन-फ्लिपकार्डपेक्षा स्वस्त मिळताय प्रोडक्ट, असा घ्या फायदा!

ONDC Portal: 'या' सरकारीवर पोर्टलवर अमेझॉन-फ्लिपकार्डपेक्षा स्वस्त मिळताय प्रोडक्ट, असा घ्या फायदा!

ONDC Portal : अमेझॉन, फ्लिपकार्ड सारख्या परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारने तयार केलेले ONDC पोर्टल हे लोकप्रिय होतेय. या पोर्टलच्या माध्यमातून एका दिवसात ऑर्डर्सची संख्या 35 हजारांच्या पुढे गेली आहे. पोर्टलवर कमी कमिशन असल्यामुळे प्रोडक्ट स्वस्त आहेत.

जाहिरात

ओएनडीसी पोर्टल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ONDC Portal : सरकारचे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे अनेक प्रायव्हेट वेबसाइट्सला टक्कर देत आहे. नुकत्याच आलेल्या आकड्यांनुसार या पोर्टलवर रिटेल ऑर्डरचा आकडा वाढून 35 हजार झाला आहे. 9 जुलैला एका दिवसात अ‍ॅपवर 35 हजारांपेक्षा जास्त रिटेल ऑर्डर करण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआरमधून या अ‍ॅपवर अधिक ऑर्डर देण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर यापूर्वी बेंगळुरू या बाबतीत पुढे होते. यावेळी एका दिवसात बेंगळुरूहून कमी रिटेल ऑर्डर्स आल्या आहेत. ONDC ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिल्ली-NCR मध्ये एकूण 11,000 रिटेल ऑर्डर देण्यात आल्या आहेत. तर बंगळुरू 7,000 ऑर्डरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर मुंबई, हैदराबाद आणि पुणे शहरांचा नंबर येतो. येथे प्रत्येक शहरातून 2,500 ते 3 हजार ऑर्डर देण्यात आल्या आहेत. या पोर्टलवर कमिशन केवळ 2 ते 4 टक्के आहे, त्यामुळे प्रोडक्टची किंमत स्वस्त होते. काय-काय ऑर्डर केलंय? ONDC अ‍ॅपवरून केलेल्या बहुतांश ऑर्डर्स फूड आणि किराणा मालाशी संबंधित होत्या. याशिवाय शेतीशी संबंधित अनेक गोष्टींच्या ऑर्डर या अ‍ॅपद्वारे केल्या गेल्या आहेत. ONDC ची निर्मिती आणि विकास सरकारने केला आहे. खरेदीदार आणि विक्रेता दोघेही या अ‍ॅपवर सामील होऊ शकतात. ओएनडीसीचे सीईओ टी कोशी म्हणतात की आमचे नेटवर्क खूप वेगाने वाढतेय. या वर्षाच्या अखेरीस, आमच्या अॅपद्वारे दररोज रिटेल ऑर्डरची संख्या 2 लाखांपर्यंत वाढेल. Indian Railway : रोज रात्री 45 मिनिटांसाठी बंद होते तिकीट बुकिंग, अवश्य जाणून घ्या वेळ लवकरच बँकिंग आणि गुंतवणुकीची सुविधा देखील मिळेल कोशी यांनी सांगितलं की, ONDC अ‍ॅपवर सध्या रिटेल आणि कृषी उत्पादनांसंबंधीत गोष्टी विकल्या जातात. पण लवकरच यावर फायनेंशियल गोष्टींही अ‍ॅड केल्या जातील. बँकिंग आणि गुंतवणुकीसंबंधीत गोष्टीही यामध्ये असतील. येत्या काही महिन्यांत या अ‍ॅपमध्ये आर्थिक गोष्टीही जोडल्या जातील, असा अंदाज आहे. यावर बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येईल. ONDC अ‍ॅप लाँच झाल्यापासून एका आठवड्यात रोजच्या ऑर्डरची संख्या 10,000 वर पोहोचली होती. यातील 40 टक्के दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या महानगरांमधून होते. Airplane Facts : फ्लाईट अटेंडंटच्या युनिफॉर्मबाबतचं ‘हे’ टॉप सिक्रेट, तुम्हालाही नसेल माहिती सरकारकडून मिळतं डिस्काउंट हे एकटे ONDC अ‍ॅप अनेक प्रायव्हेट ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत आहे. अमॅझॉन, फ्लिपकार्ड, स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांना हे अ‍ॅप टक्कर देतेय. या अ‍ॅपवर 1 जूनपासून इंसेंटिव्ह स्किमचा फायदाही दिला जातोय. येथे खरेदीदारांना दर महिन्याला 5 ट्रांझेक्शनवर इंसेंटिव्ह मिळते. पूर्वी दररोज 3 ऑर्डरवर इंसेंटिव्ह मिळत होते. हे रिवॉर्ड फोनपे, पेटीएम, मॅजिकपिनद्वारे पेमेंट केल्यावर दिले जातेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या