JOIN US
मराठी बातम्या / मनी / Google चा मोठा निर्णय, ही सेवा बंद होणार, तुमचं तर नाव या लिस्टमध्ये नाही?

Google चा मोठा निर्णय, ही सेवा बंद होणार, तुमचं तर नाव या लिस्टमध्ये नाही?

युजर्सनी जर याचं पालन केलं नाही तर त्यांचं खातं बंद करण्यात येईल असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

जाहिरात

गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही Gmail आणि गुगल ड्राईव्ह वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गुगलने आपली नवीन पॉलिसी जारी केली असून ती तत्काळ लागू करणार आहे. त्यामुळे युजर्सनी जर याचं पालन केलं नाही तर त्यांचं खातं बंद करण्यात येईल असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. ज्या लोकांनी दोन वर्षांपासून गुगल अकाउंट साइन इन केलं नाही त्या युजर्सचं खातं कायमस्वरुपी गुगल बंद करणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इनएक्टिव्ह खात्यांना गुगल कायमस्वरुपी बंद करणार आहे. जीमेल, डॉक्स, ड्राइव्ह, मीट, कॅलेंडर, युट्यूब आणि गुगल फोटो या सगळ्याचा समावेश असणार आहे.

कर्मचारी कपातीनंतर Google चा मोठा निर्णय, कंपनीची कॉस्ट कटिंग मोहीम सुरूच

गुगल युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी ब्लॉगमधून दिली आहे. इनअॅक्टिव्ह खातं सेफ नाहीत. त्यामुळे त्या खात्यावर थोडी छे़डछाड झाली तरी युजरच्या इतर माहितीपर्यंत हॅकर्सना पोहोचणं अधिक सोपं होऊ शकतं. त्यामुळे अशा खात्यांना वेळीच बंद करणं सुरक्षित असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. टू-स्टेप-वेरिफिकेशन अॅक्टिव्ह असलेली खातं जास्त आहेत. पण इनअॅक्टिव्ह खात्याचं प्रमाण दहापट कमी असेल असा गुगलकडूनच सांगण्यात आलं आहे. याचा अर्थ ते असुरक्षितही असू शकतात, त्यांना अगदी सहज हॅक केलं जाऊ शकतं. त्यामुळे अशी खाती बंद करणंच योग्य असं त्यांनी म्हटलं आहे.

Google India Jobs: Google इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी बंपर ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? लगेच बघा डिटेल्स

संबंधित बातम्या

तुमचं गुगल खातं अॅक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा त्यासाठी गुगलने सांगितलं आहे की टू स्टेप व्हेरिफिकेशन करा. तुमचं जीमेल, गुगल प्ले स्टोअर, गुगल सर्च, युट्यूब या सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू आहेत का चेक करा. त्या सुरू असतील तर तुमचं खात अॅक्टिव्ह आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या