Representative Image
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees News Update) आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee Bonus) 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतकेच बोनस मिळतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur on Railway Employee Bonus) यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या (Cabinet Meeting Today) निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन विभागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षानुवर्षे, प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस रेल्वेच्या नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळतो आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, यावर्षीही रेल्वेच्या राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. यासाठी सुमारे 1,985 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. हे वाचा- तुम्हाला मिळाले का Aditya Birla Sun Life AMC चे शेअर्स? अशाप्रकारे त्वरित तपासा यावेळी ठाकूर यांनी अशी माहिती दिली की, ‘दरवर्षी सरकार रेल्वेच्या गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना हा बोनस देते. एक समिती एका सूत्रानुसार हा बोनस ठरवते. या सूत्रानुसार, कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 72 दिवसांचे वेतन मिळणार होते. पण पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बोनस म्हणून 78 दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.’