JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Silver Rate Today : सोन्याने ओलांडला 54 हजारांचा उंबरठा, तुमच्या शहरात काय आहे दर चेक करा

Gold Silver Rate Today : सोन्याने ओलांडला 54 हजारांचा उंबरठा, तुमच्या शहरात काय आहे दर चेक करा

गेल्या काही दिवसांपासून सोनं कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे आता 56 पर्यंत दर पोहोचणार का? अशी चिंता सतावत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: लग्नसराईचे दिवस आहेत आणि वर्ष संपायलाही अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्षाअखेरीस सोनं आणखी वाढेल अशी चिंता आता सतावत आहे. आज सोन्याने 54 हजारांचा उंबरठा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे आता 56 पर्यंत दर पोहोचणार का? अशी चिंता सतावत आहे. तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मंगळवार, 13 डिसेंबर रोजी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 टक्क्यांने वाढले आहेत. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.54 टक्क्यांनी वाढले आहेत. याआधीच्या व्यापार सत्रात चांदीमध्ये 0.38 टक्क्यांची घसरण झाली होती. मंगळवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव (सोन्याचा दर आज) 54,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. शेअर बाजार उघडताच 54 हजार 197 रुपये दर होता. आता तो वाढून 54 हजार 330 पर्यंत पोहोचला आहे. 24 कॅरेट 1 ग्रॅमसाठी- 5,433 24 कॅरेट 8 ग्रॅमसाठी - 43,464 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी - 54,330

तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

22 कॅरेट 1 ग्रॅमसाठी - 4,980 22 कॅरेट 8 ग्रॅमसाठी - 39,840 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी - 49,800 10 दिवसांपूर्वी सोन्याचे दर 54,146 रुपये होते. आज तेच 200 रुपयांनी वाढला आहे. एक महिन्यांपूर्वी हाच दर 53,613 रुपये होता. तीन महिन्यांपूर्वी हाच दर 51,776 रुपये होता. म्हणजे जवळपास तीन हजार रुपयांनी ही वाढ झाल्याचं म्हणायला हवं. आता नवीन वर्षाआधी हाच दर 56 पर्यंत पोहोचेल अशी भीती आहे. त्यामुळे लोक सोनं खरेदीकडे वळत आहेत.

Gold Jewellery Insurance: चिंताच मिटली! आता स्वत:च्या घरातच सुरक्षित ठेवा दागिने, बँक लॉकरची नाही गरज

संबंधित बातम्या

सोन्याची शुद्धता कशी तपासायची? केंद्र सरकारने जारी केलेल्या बीआयएस केअर अॅपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही खरेदी केलेले सोने खरे आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला सोन्याच्या गुणवत्तेबद्दल शंका असेल तर तुम्ही त्याची माहिती अॅपवर टाकू शकता आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून सोने खरेदी केले आहे त्या ठिकाणाबाबत तक्रारही करू शकता. तुमच्या तक्रारीवर संबंधित विभागाने केलेल्या कारवाईचीही माहिती मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या