मुंबई, 12 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर 48000 रुपये प्रति तोळापेक्षा (Gold Rate Today) कमी आहेत. सध्या सोन्याचांदीच्या दरात सातत्याने (Gold Price Latest Update) चढउतार होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) आज सोन्याचे दर 0.06 टक्क्यांनी कमी झाले आहेत तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी उतरले आहेत. सोनंचांदी किती झाली स्वस्त आज, फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX वर सोने 0.06 टक्क्यांनी घसरून 47,659 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. त्याचवेळी, आजच्या व्यवहारात चांदी 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. रेकॉर्ड स्तरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त आहे सोनं ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर अर्थात 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 47,543 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात आता सोन्याचे दर जवळपास 8541 रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त आहेत. हे वाचा- Petrol-Diesel: आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव, एका क्लिकवर जाणून घ्या लेटेस्ट दर घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.