JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोने-चांदी दरात पुन्हा घसरण; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात पुन्हा घसरण; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

आज डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास 12 पैशांनी मजबूत झाला. त्याच्या परिणाम भारतीय बाजारात सोन्याच्या दरावर पाहायला मिळाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : भारतीय बाजारात आज सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी 24 फेब्रुवारी 2021 रोजी सोने दरात 148 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली आहे. तर चांदीचा भावही (Silver Price Today) कमी झाला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,455 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 69,562 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारला असून चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Price, 24 February 2021) - दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दरात 148 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 46,307 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी सोन्याचा भाव 46,455 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढून आज 1,807 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे.

(वाचा -  सोने दरात 16 टक्के घसरण; पाहा सध्याच्या किंमतीत गुंतवणूक केल्यास कसा होईल फायदा )

चांदीचा नवा दर (Silver Price, 24 February 2021) - चांदीच्या किंमतीत बुधवारी मोठी घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 886 रुपयांनी घसरला असून, सध्या चांदीचा भाव 68,676 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव आधीप्रमाणेच 27.63 डॉलर प्रति औंस इतका असून यात कोणताही बदल झालेला नाही. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट (HDFC Securities) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास 12 पैशांनी मजबूत झाला. त्याच्या परिणाम भारतीय बाजारात सोन्याच्या दरावर पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या उच्च किंमतीवर भारतीय गुंतवणुकदारांनी नफा कमावला. त्यामुळेही दिल्ली सराफा बाजारात गोल्ड रेटमध्ये कमी आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या