JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: 44000 रुपयांहून खाली उतरला सोन्याचा भाव तर चांदी महागली, वाचा लेटेस्ट दर

Gold Price Today: 44000 रुपयांहून खाली उतरला सोन्याचा भाव तर चांदी महागली, वाचा लेटेस्ट दर

Gold Silver Price, 9 March 2021: आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे दर वधारले आहेत. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे भारतातही दर वधारले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 मार्च: गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात कोसळत असणारे सोन्याचे दर **(Gold Price Today)**आता पुन्हा एकदा वाढू लागले आहे. काही किरकोळ वाढ होत असली तरी सोनं घेऊ इच्छिणाऱ्या सामान्यांच्या बजेटवर मात्र त्यामुळे नक्कीच परिणाम होत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी 09 मार्च रोजी केवळ 35 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे. या वाढीनंतरही सोन्याचे दर 44,000 रुपये प्रति तोळापेक्षा कमीच आहेत. दरम्यान आज चांदीचे दर 500 रुपयांपेक्षा अधिक दराने वधारले आहेत. याधीच्या सत्रात सोन्याचे दर दिल्लीतील सराफा बाजारात 43,961 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 65,068 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत आज तेजी पाहायला मिळाली. तर चांदीचे दर आज याठिकाणी स्थीर होते. काय आहेत सोन्याचे नवे दर (Gold Price, 9 March 2021) दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 35 रुपये प्रति तोळा अशी किरकोळ वाढ झाली आहे. या वाढीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 43,996 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याधीच्या सत्रात सोन्याचे दर दिल्लीतील सराफा बाजारात 43,961 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज वाढून 1,696 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा- SEBI नं बदलले PAN नंबर संदर्भातील नियम, 1 एप्रिलपासून लागू, वाचा काय होणार बदल ) काय आहेत चांदीचे नवे दर (Silver Price, 9 March 2021) चांदीच्या दरात आज वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात प्रति किलो 553 रुपये झालेल्या वाढीनंतर दर 65,621 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्‍ट्रीय बाजारात (International Market) आज चांदीचे भाव स्थीर होते. याठिकाणी चांदीचे भाव आजही 25.50 डॉलर प्रति औंस होते. (हे वाचा- 15 मार्चला आहे मोठी कमाई करण्याची संधी! इतके पैसे गुंतवणून मिळवा मोठा फायदा ) का वाढले सोन्याचांदीचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचांदीच्या किंमतीची परिणाम देशांतर्गत सोन्याचांदीच्या किंमतीवर झाला आहे. डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्यामध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. त्यांनी अशी माहिती दिली आहे की न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचे दर वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते 2021 मध्ये सोन्याचे दर जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे. मार्केट एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, जर सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली तर हे दर 63,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या