JOIN US
मराठी बातम्या / मनी / कोरोना व्हायरस लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम, 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर सोन्याचे दर

कोरोना व्हायरस लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम, 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर सोन्याचे दर

कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार असल्याच्या बातम्यांमुळे देशामध्ये लवकरच आर्थिक तेजी परत येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 डिसेंबर: देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) व्हॅक्सिन संदर्भात सकारात्मक वृत्त समोर आल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीतही (Gold Rates) घसरण होत आहे. कोरोना लशीच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक असणाऱ्या संपत्तीवर परिणाम होत आहे. सोमवारी सोन्याचे (Gold Rates on 30th November 2020) दर गेल्या 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत. गुंतवणूकदार सोन्यातील पैसे काढून शेअर बाजारात गुंतवत आहेत. जगभरातील मार्केटमध्ये कोरोना व्हॅक्सिन संदर्भातील बातम्यांमुळे आशावाद पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात देखील तेजी पाहायला मिळते आहे. 2 जुलैच्या नीचांकी स्तरावर पोहोचलं सोनं सोमवारी स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी कमी होऊन  1,774.01 डॉलर प्रति औंस झाले आहे, यामुळे सोन्याची या महिन्यातील घसरण 5.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती 2 जुलैच्या नीचांकी स्तराच्याही खाली गेल्या आहेत. या दिवशी दर 1,764.29 डॉलर प्रति डॉलर होते. (हे वाचा- पैसे पाठवण्यापासून ते रेल्वेप्रवासापर्यंत, आजपासून तुमच्या आयुष्यात होणार हे बदल ) अमेरिकन गोल्ड फ्यूचर 0.6 टक्क्यांनी कमी होऊन 1,771.20 डॉलर प्रति औंस झाले आहे. क्रेग अरलम या तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, व्हॅक्सिनच्या बातम्यांमुळे आशावाद पाहायला मिळत आहे आणि आम्ही डॉलर, ट्रेजरी यासारख्या सुरक्षित मालमत्तांमधून पैसे काढताना पाहात आहोत आणि या गोष्टींचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम दिसतो. (हे वाचा- 2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार! 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव ) आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्ज झिरो म्हणाले की गुंतवणूकदार त्यांचे पैसे सोन्यामधून काढून घेत आहेत. गुंतवणूकदारांना आशा आहे की ही लस लागू झाल्यानंतर बाजारात चांगली वाढ दिसून येईल आणि संक्रमणापासून मुक्तता मिळेल. चांदी किती उतरली? नोव्हेंबर महिन्यात चांदी 5..5 टक्क्यांनी घसरली आहे. याव्यतिरिक्त, चांदी सोमवारी 1.6 टक्क्यांनी घसरून 22.34 डॉलर प्रति औंस झाली. प्लॅटिनमबद्दल बोलताना ते 1.3 टक्क्यांनी वाढून 975.84 डॉलरवर गेले होते. पॅलेडियम 0.7 टक्क्यांनी घसरून 2,407.51 डॉलरवर आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या