नवी दिल्ली, 09 एप्रिल : देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजार बंद आहेत. दिल्लीतील सराफा बाजार देखील बंद आहे. सोन्याच्या बाजारावर देखील लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती वाढत होत्या. मात्र आज सोन्याच्या वायदे बाजारात प्रॉफिट बुकिंगचा परिणाम पाहायला मिळाला. सोन्याच्या वायदा किंमतीत 0.11 टक्के अर्थात 51 रुपयांची घसरण झाल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे वायदे बाजारात गुरूवारी सोन्याची किंमत प्रति तोळा 44,890 रुपये इतकी आहे. (हे वाचा- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी ) Silver Future मध्ये 0.39 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे चांदीच्या किंमती 170 रुपयांनी कमी झाल्या आहेत. परिणामी प्रति किलो चांदीची किंमत 42,969 रुपये आहे. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे गुरूवारी देखील Spot Gold मार्केट बंद होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशा प्रमाणात सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. (हे वाचा- लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला मोठा फटका ) त्याचप्रमाणे बुधवारी संध्याकाळी देखील फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी संध्याकाळी सोन्याची 5 जूनच्या वायदा किंमतीत 0.53 टक्के अर्थात 241 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वायदे बाजारात बुधवारी सोन्याची किंमत प्रति तोळा 44,840 रुपये इतकी होती. 5 ऑगस्टच्या वायदा किंमतीतही MCX मध्ये घसरणच आढळून आली. सोन्याच्या किंमतीवर परिणाम होण्याची महत्त्वाची कारणं कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील बाजारामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे जगभरातील विविध महत्त्वाच्या चलनांपेक्षा डॉलरचे मूल्य वाढले आहे. त्याचप्रमाणे सोन्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. परिणामी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोन्याची आयात करण्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक होता. आता भारत चौथ्या स्थानावर गेला आहे. भारतात सोन्याची आयात चीनमधून केली जाते. परिणामी भारतात सोन्याची किंमत वाढल्यामुळे मागणी 6 वर्षांमध्ये सगळ्यात कमी स्तरावर पोहोचली आहे. संपादन-जान्हवी भाटकर