नवी दिल्ली, 20 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारात सतत पडत चाललेल्या सोन्याच्या किमतीत थोडी सुधारणा झाल्यावर त्याचा परिणाम स्थानिक बाजारातही जाणवला आहे. गेल्या काही दिवसांतली सर्वाधिक दरवाढ शुक्रवारी सराफा बाजारात दिसली. सोन्याबरोबर (Gold Price 20th March 2020)चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात सोन्याच्या दराने घेतलेली उसळी विक्रमी ठरू शकेल एवढी मोठी आहे. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन झाल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर झालेला होता. त्या धक्क्यातून बाहेर येत सोन्याचे दर आज 1,395 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे वाढले. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर (latest Gold rate 20th March 2020) जवळपास तोळ्यामागे 1400 रुपयांनी वाढून 41,705 रुपये प्रति दहा ग्रॅम यावर पोहोचले. गुरुवारी हाच भाव 40,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 1,514 डॉलर प्रति आौन्स एवढा होता. वाचा - कोरोनाची झळ आता सामान्यांच्या खिशाला, ‘या’ 7 गोष्टी महागणार चांदीचा दरही(Silver Rate 20th March 2020)शुक्रवारी जोरदार वाढला. चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 2,889 रुपयांनी वधारला. शुक्रवारी चांदीचे दर दिल्लीच्या बाजारात 38,100 रुपये प्रति किलो एवढे होते. गुरुवारी चांदीचा भाव 35,211 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 12.96 डॉलर प्रति औन्स होता. कोरोनाचा परिणाम बाजारावर सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर कोरोनाव्हायरचा प्रभाव जाणवला. रोज वाढणारी दागिन्यांची मागणी 75 टक्क्यांनी कमी झाली आगे. सध्या फक्त 20 ते 25 टक्के व्यवहारच सुरू आहेत. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काौन्सिलचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले, “सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या कोरोनाच्या भीतीमुळे कमालीची रोडावली आहे. देशभरात हेच चित्र आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात दुकानदारांना मोठं नुकसान होत आहे. त्यांचा फक्त 20-25 टक्के व्यवसायच होतो आहे.” अन्य बातम्या कनिका कपूरमुळे भाजपच्या या माजी मुख्यमंत्र्यांना व्हावं लागलं क्वारंटाइन ‘महाराष्ट्राची #Italy होऊ द्यायची नसेल तर ‘सरकारी कर्फ्यू’ जाहीर करा’