नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: गेल्या महिन्यात सोन्याचांदीच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळाला. दरम्यान अधिक प्रमाणात या मौल्यवान धातूंचे दर सप्टेंबर महिन्यात उतरले आहेत. तर आजपासून सुरू झालेल्या ऑक्टोबर महिन्यातही सोन्याचांदीच्या दरातील घसरणीचा पॅटर्न सुरू आहे. आज पहिल्याच दिवशी एमसीएक्सवर सोन्याचे दर उतरले आहेत. सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) आजही मोठी घसरण सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.05% नी कमी झाली आहे. तर चांदीच्या दरात (silver price today) 0.19 टक्क्यांनी घसरण झाली आहे. काय आहे आजचा सोन्याचांदीचा दर? डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today on Multi commodity Exchange) 0.05% नी कमी होऊन 46,497 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर देखील (silver price) 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 59,504 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. हे वाचा- महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 9700 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे कारण सोने रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा 9700 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. आज MCX वर सोन्याचा दर 46,497 रु. प्रति तोळा आहे. या दराच्या तुलनेत आज सोन्याचा दर 9700 रुपयांनी कमी आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा- एका SMS च्या जाळ्यात अडकला अन् गमावून बसला 3 लाख, तुम्हालाही आलाय असा मेसेज? अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.